Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा 'हा' उपाय, अन्यथा येऊ शकतात अडचणी 

आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा 'हा' उपाय, अन्यथा येऊ शकतात अडचणी 

आधार कार्डमध्ये एक युनिक क्रमांक असतो, जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 12:33 PM2023-06-04T12:33:47+5:302023-06-04T12:34:14+5:30

आधार कार्डमध्ये एक युनिक क्रमांक असतो, जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केला जातो.

aadhaar card fraud how to keep safe your aadhaar card know tips | आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा 'हा' उपाय, अन्यथा येऊ शकतात अडचणी 

आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा 'हा' उपाय, अन्यथा येऊ शकतात अडचणी 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत आधार कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. बँक खाते उघडण्यापासून ते ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यापर्यंत व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. मात्र, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता. त्याबद्दल जाणून घ्या...

आधार कार्डमध्ये एक युनिक क्रमांक असतो, जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) जारी केला जातो. यात फिंगरप्रिंट, आयआरआयएस आणि चेहरा यांसारखी बायोमेट्रिक माहिती देखील आहे. डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल वाढत्या चिंता पाहता आपल्या डेटाचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. फसवणूक करणारे बायोमेट्रिक डिटेल्सचा गैरवापर करू शकतात आणि आधार कार्ड वापरून अनधिकृत प्रमाणीकरण करू शकतात.

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी युआयडीएआय एक सुविधा प्रदान करते, ज्याद्वारे तुम्ही तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक करू शकता. वैध आधार कार्ड असणारे व्यक्ती आपले बायोमेट्रिक डिटेल्स लॉक आणि तात्पुरते अनलॉक करण्यासाठी या सुविधेचा वापर करू शकतात. दुसरीकडे, जर तुमचा आधार बायोमेट्रिक लॉक असेल, तर आधार कार्ड धारक प्रमाणीकरणासाठी डिटेल्स वापरू शकणार नाही.

बायोमेट्रिक डिटेल्समध्ये प्रवेश
जर बायोमेट्रिक्स लॉक झाल्यास कोणीही आधार वापरून कोणत्याही प्रमाणीकरण सेवेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, एक सामान्य त्रुटी कोड 330 सूचित करेल की बायोमेट्रिक डिटेल्समध्ये प्रवेश करणे शक्य नाही.

आधार बायोमेट्रिक डेटा कसा लॉक करावा?
यासाठी युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे आधार बायोमेट्रिक डिटेल्स लॉक करण्याचा पर्याय शोधा. एकदा तुम्ही तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक केल्यानंतर, तुम्ही ते अनलॉक करणे किंवा बायोमेट्रिक लॉक डिसेबल करण्याचा पर्याय निवडेपर्यंत ते प्रवेश करण्यापासून बाहेर राहत.

Web Title: aadhaar card fraud how to keep safe your aadhaar card know tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.