Aadhaar Update Process HOF : UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी एक विशेष सेवा आणली आहे. देशात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या नावावर पत्त्याचा पुरावा नाही, पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांचा पत्ता त्यांच्या आधारमध्ये अपडेट करावा लागतो तेव्हा अडचण येते. अशा आधार धारकांची समस्या समजून घेऊन UIDAI ने एक नवीन सेवा सुरु केली आहे. तुम्ही तुमच्या कुटुंब प्रमुखाद्वारे (HOF) आधार अपडेट करू शकता. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त कुटुंब प्रमुखाची परवानगी घ्यावी लागेल. आधारची ही सेवा अशा लोकांना मदत करेल ज्यांच्याकडे पुराव्यासाठी दुसरे कोणतेही कागदपत्र नाही. UIDAI ने 3 जानेवारी 2023 रोजी या अपडेटबाबत अधिसूचना जारी केली आहे.
आता UIDAI ने 'हेड ऑफ फॅमिली'च्या आधारवर आधारित व्हॅलिडेशन प्रोसेसद्वारे आधार माहिती अपडेट करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. ज्यांच्या नावावर पत्त्याचा पुरावा नाही त्यांच्यासाठी 'हेड ऑफ फॅमिली' आधारित आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची पद्धत उपयुक्त ठरेल. कुटुंब प्रमुखाचे नातेवाईक जसे मुले, पती/पत्नी, आई वडिल इत्यादींना या सेवेचा लाभ घेता येईल. जर त्याच्या नावावर पत्त्याचा पुरावा नसेल, तर कुटुंब प्रमुख त्याच्या स्वतःच्या नावाने आधारभूत कागदपत्रे देऊ शकतो. असे केल्याने आधार कार्ड अपडेट केले जाईल.
या कादपत्रांची गरज
रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रांसह कुटुंब प्रमुखाद्वारे आधार अपडेट केले जातील. या दस्तऐवजांसह, आपण कुटुंबाच्या प्रमुखाशी आपले नाते किंवा संबंध सिद्ध करण्यास सक्षम असाल. जर नात्याशी संबंधित असा कोणताही पुरावा नसेल, तर अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख स्व-घोषणापत्र देऊ शकतो. आधार अपडेट करण्याची ही पद्धत अशा लोकांसाठी उपयुक्त ठरेल जे कामानिमित्त इतर शहरात शिफ्ट होतात. https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आपले आधार अपडेट करू शकता.