आधार कार्ड महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. ते इतर महत्त्वाच्या कागदपत्रांपेक्षा वेगळं ठरतं कारण त्यात व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती असते. आधार कार्ड सर्वच कामांसाठी उपयुक्त ठरतं, त्यामुळे ते अपडेट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चुकीची माहिती टाकली असेल तर ती ताबडतोब दुरुस्त केली पाहिजे आणि त्याच वेळी तुम्ही सर्व चुका एकाच वेळी सुधारल्या जातील याचीही काळजी घेतली पाहिजे.नाव दोनदाच बदलता येतंआधार कार्डमध्ये नावाचं स्पेलिंग चुकीचे असल्यास किंवा लग्नानंतर महिलेला तिचं आडनाव बदलायचं असेल तर ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येतं. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की आधार कार्डवर नाव बदलण्यासाठी फक्त दोनदाच संधी दिली जातात. यानंतर तुम्ही तुमचे नाव बदलू शकणार नाही.
लिंग बदलण्याची एकदा संधीआधार कार्ड बनवताना जर त्यामध्ये लिंग चुकीचं टाकलं गेलं असेल तर UIDAI च्या नियमांनुसार ते बदललं जाऊ शकते. यासाठीही तुम्हाला एकदा संधी दिली जाते.जन्मतारीख एकदा बदलता येतेजर तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असेल, तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्याची फक्त एक संधी दिली जाते. यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.
ही माहिती कितीही वेळा बदलता येतेआधार कार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फिंगरप्रिंट, फोटो, रेटिना स्कॅन यासारख्या गोष्टी तुम्ही आधार कार्डमध्ये अनेक वेळा अपडेट करू शकता. हे अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.