नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) देशभरात 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अपडेट केंद्रे उघडण्याच्या तयारीत आहे. UIDAI ने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या, 166 पैकी 55 आधार सेवा केंद्रे (ASKs) कार्यरत आहेत. याशिवाय, बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारांद्वारे 52,000 आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.
UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 122 शहरांमध्ये 166 सिंगल आधार नोंदणी आणि अपडेट केंद्रे उघडण्याची UIDAI योजना आखत आहे. दरम्यान, आधार सेवा केंद्रे आठवड्याचे सातही दिवस उघडली जातात. आधार केंद्रांनी दिव्यांगांसह 70 लाख लोकांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.
नावनोंदणी आणि अपडेटची क्षमता
मॉडेल- ए च्या आधार सेवा केंद्रांमध्ये (Model-A ASKs) दररोज 1,000 नावनोंदणी आणि अपडेट रिक्वेस्ट पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर, मॉडेल-बी (Model-B ASKs) 500 आणि मॉडेल-सी (Model-C ASKs) 250 मध्ये नावनोंदणी आणि अपडेशनची रिक्वेस्ट पूर्ण करण्याची क्षमता आहे. दरम्यान, UIDAI ने आतापर्यंत 130.9 कोटी लोकांना आधार क्रमांक दिला आहे.
आधार सेवा केंद्र प्रायव्हेटमध्ये उपलब्ध नाही
आपल्या माहितीसाठी, आधार सेवा केंद्र प्रायव्हेटमध्ये उपलब्ध नाही. म्हणजेच, आधार सेवा फक्त बँका, पोस्ट ऑफिस, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून (ज्या अंतर्गत आधार केंद्रे सुरू आहेत) मिळवू शकता.
इंटरनेट कॅफेमधील लोक करतात आधारशी संबंधित कामे
इंटरनेट कॅफे आधारशी संबंधित समान सेवा देतात, जी UIDAI सामान्य माणसाला देते. आधार कार्डमध्ये फक्त नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशील दुरुस्त करणे, फोटो बदलणे, पीव्हीसी कार्ड प्रिंट करून घेणे, सामान्य आधार कार्ड मागणे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. UIDAI द्वारे आधारमध्ये कोणत्याही दुरुस्तीसाठी किंवा PVC कार्ड मिळविण्यासाठी निर्धारित शुल्क 50 रुपये आहे, परंतु, कॅफे 70 ते 100 रुपये आकारते. अशाप्रकारे त्यांना अशा कामांसाठी 30 ते 50 किंवा 100 रुपयेही मिळतात.