Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar Card Update : आधार कार्डमध्ये बदल करायचाय? पाहा किती वेळा करू शकता करेक्शन

Aadhaar Card Update : आधार कार्डमध्ये बदल करायचाय? पाहा किती वेळा करू शकता करेक्शन

Aadhaar Card Update : UIDAI आधार कार्डामध्ये काही बदल करायचे असतील तर काही ठराविक नियमांचं पालन करावं लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 05:00 PM2021-10-31T17:00:14+5:302021-10-31T17:00:31+5:30

Aadhaar Card Update : UIDAI आधार कार्डामध्ये काही बदल करायचे असतील तर काही ठराविक नियमांचं पालन करावं लागणार आहे.

Aadhaar Card Update Want to make changes to Aadhaar Card See how often you can make corrections | Aadhaar Card Update : आधार कार्डमध्ये बदल करायचाय? पाहा किती वेळा करू शकता करेक्शन

Aadhaar Card Update : आधार कार्डमध्ये बदल करायचाय? पाहा किती वेळा करू शकता करेक्शन

सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) सध्या एक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डाचा वापर सरकारी स्कीम्सचा वापर करण्यासाठी, तसंच एलपीजी गॅस सब्सिडीसह अनेक गोष्टींसाठी केला जातो. अशातच आधार कार्डावरील तुमची आधार कार्डावरील माहिती योग्य असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला नाव, पत्ता, लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल तर तर त्यात किती वेळा बदल करता येतो हे तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही यातील काही बदल ऑनलाइन पद्धतीनंही करू शकता.

किती वेळा करू शकता करेक्शन?
1. नाव (Name): नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येतं.
2. जन्म तारीख (Date of Birth ) : यात केवळ एकदाच करेक्शन करता येतं.
3. पता (Address) : तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
4. लिंग (Gender) : यामध्ये तुम्ही केवळ एकदाच बदल करू शकता.
5. मोबाइल नंबर (Mobile No.): मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासही कोणतीही मर्यादा नाही.
6. फोटो (Photo): जर तुमचा फोटो क्लियर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर तुम्ही फोटो कितीही वेळा बदलू शकता.

ऑनलाइन करू शकता काम
तुम्हाला काही बदल करायचे असल्यास तुम्ही UIDAI ची वेबसाईट https://uidai.gov.in/ यावर जावं लागेल. त्यानंतर माय आधार हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर अपडेट युअर आधार या सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही  demographics data online हा ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर तुम्ही एका दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट व्हाल. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या समोर सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

 

Web Title: Aadhaar Card Update Want to make changes to Aadhaar Card See how often you can make corrections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.