Join us

'आधार' कार्डची मुदत किती वर्षानंतर संपते? UIDAI संस्थेने दिली महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:51 IST

aadhaar card update : दर १० वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले जाते. पण, जर असे केले नाही. तर आधार कार्ड बाद ठरते का? आधार जारी करणारी संस्था UIDAI ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

aadhaar card update : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र मानलं जातं. या कागपत्राशिवाय तुमचं पानही हलणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, आधार कार्डविषयी आजही अनेकांच्या मनात काही गैरसमज पसरले आहेत. जसे की एकदा आधार कार्ड काढलं की मरेपर्यंत टेन्शन नाही. पण, असे बिलकुल नाही. तुमच्या आधार कार्डला विशिष्ट मुदत आहे. या मुदतीनंतर तुमचे आधार कार्ड अवैध ठरणार नाही. पण, तुमचे अनेक सरकारी आणि खासगी कामे खोळंबू शकतात.

१० वर्षांनंतर आधार अपडेट करणे आवश्यक आहे का?अनेक ठिकाणी १० वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यावर आधार जारी करणारी संस्था यूआयडीएआयने स्पष्टीकरण दिलं आहे. तुम्ही १० वर्षानंतर आधार अपडेट केलं नाही, तरीही ते अवैध ठरणार नाही. मात्र, अनेकदा वयानुसार हाताच्या बोटाच्या ठशात शुक्ष्म बदल होतात. परिणामी बायोमेट्रीक ऑथिंटीकेशन होण्यास अडथळा निर्माण होतो. यासाठी आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करण्यास यूआयडीएआयने सांगितले आहे.

मुलांचे आधार अपडेट मोफत५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सरकारने ते विनामूल्य केले आहे. म्हणजेच तुमच्या मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. त्याच वेळी, ज्येष्ठांच्या आधार कार्ड अपडेटसाठी, अगदी नाममात्र रक्कम भरावी लागेल.

आधार कार्डचे काम काय?आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक यूनिक आइडेंटिफिकेशन डॉक्यूमेंट आहे, ज्याचा वापर ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि विविध सरकारी आणि गैर-सरकारी सेवांसाठी केला जातो. बँकिंग, मोबाइल सिम, सरकारी अनुदाने, कर भरणे आणि इतर अनेक ठिकाणी हे आवश्यक मानले जाते.

टॅग्स :आधार कार्डसरकार