Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar कार्डवरील Address अपडेट करणं सोपं, वापरा ऑनलाइन पद्धत

Aadhaar कार्डवरील Address अपडेट करणं सोपं, वापरा ऑनलाइन पद्धत

Aadhaar : ऑफलाइनद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रिया देखील खूप लांब होते. नागरिकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी, UIDAI घरी बसून ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 08:12 PM2021-08-03T20:12:43+5:302021-08-03T20:13:26+5:30

Aadhaar : ऑफलाइनद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रिया देखील खूप लांब होते. नागरिकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी, UIDAI घरी बसून ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा देत आहे.

aadhaar news update your adhaar address online with the help of these simple steps | Aadhaar कार्डवरील Address अपडेट करणं सोपं, वापरा ऑनलाइन पद्धत

Aadhaar कार्डवरील Address अपडेट करणं सोपं, वापरा ऑनलाइन पद्धत

नवी दिल्ली : सध्याच्या काळात जवळजवळ सर्व महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. तुम्हाला बँक खाते उघडायचे असेल, स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन मिळवायचे असेल किंवा इतर कोणतेही सरकारी काम असो जवळजवळ सर्वत्र  आधार आवश्यक आहे. परंतु कधीकधी अशी परिस्थिती असते, जेव्हा आपल्या आधार कार्डवर दुसऱ्या शहराचा पत्ता असतो आणि आपण एका वेगळ्या शहरात राहतो. अशा परिस्थितीत कधीकधी आपल्याला अडचणींनाही सामोरे जावे लागते.

ऑफलाइनद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रिया देखील खूप लांब होते. नागरिकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी, UIDAI घरी बसून ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा देत आहे. याद्वारे, तुम्ही काही सोप्या स्टेप्सला फॉलो करून आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकता.

 जाणून घ्या पत्ता अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया...
- आधारवर तुमचा ऑनलाइन पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर  https://uidai.gov.in/  जावे लागेल, जिथे तुम्हाला एक My Aadhaar चा टॅब दिसेल.

- My Aadhaar वर क्लिक केल्यावर तुम्हाला दुसऱ्या रांगेत Update Your Aadhaar चा पर्याय दिसेल. Update च्या पर्यायावर गेल्यावर, तुम्हाला तिथे your address online या तिसऱ्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन पेज ओपन होईल. जिथे खाली गेल्यानंतर तुम्हाला Proceed to Update Address वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि कॅप्चा व्हेरिफिकेशन करून सेंड OTP  वर क्लिक करावे लागेल. 

- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP मेसेज येईल.  आलेला OTP मेसेज इंटर केल्यानंतर, आपल्याला Data Update Request च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्ही पत्ता पर्यायावर क्लिक करून आपला नवीन पत्ता अपडेट करू शकता.

- नवीन पत्ता अपडेट करण्यासाठी, आपल्याला आपल्या सध्याच्या पत्त्याची संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर सहाय्यक कागदपत्रे म्हणजेच पत्ता पुराव्याचा रंगित स्कॅन फोटो अपलोड करावा लागेल. हे अपडेट केल्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता अपडेट केला जाईल.

Web Title: aadhaar news update your adhaar address online with the help of these simple steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.