Join us

PAN-Aadhaar link : पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 10:34 PM

प्राप्तिकर विभागाने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे करदात्यांनी पॅन कार्ड अजूनही आधार कार्डशी लिंक केले नसेल तर त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 

31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्डआधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे आहे, याची आठवण प्राप्तिकर विभागाने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी  एका जाहीर निवेदनाद्वारे करदात्यांना करून दिली होती. मात्र, आता प्राप्तिकर विभागाने  पॅन-आधार लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

आधार कार्डाशी पॅन कार्ड असे करा लिंक - सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in या इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर लॉग इन करावे.- होम पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.- पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे पॅन कार्डचा नंबर तसेच आधार नंबर, आधार कार्डावर असलेले नाव टाकावे.- आधार कार्डावर केवळ जन्माचे वर्ष असल्यास त्या पर्यायाला टीक करावी.- सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कॅप्चा टाकून सबमिट करावे.- लिंक झाल्यावर एक मेसेज मिळेल. जर आपले पॅन आणि आधार कार्ड आधीच लिंक झालेले असेल, तर तसा मेसेज आपल्याला दिसेल. एसएमएसद्वारेही हे लिंक करता येते.  

टॅग्स :आधार कार्डपॅन कार्ड