Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' लोकांसाठी Aadhaar-PAN Link करणे गरजेचे नाही, तुम्हीही यात सहभागी आहात का?

'या' लोकांसाठी Aadhaar-PAN Link करणे गरजेचे नाही, तुम्हीही यात सहभागी आहात का?

Aadhaar-PAN Link: आता आधार-पॅन लिंकची शेवटची तारीख 31 मार्च आहे, त्यामुळे आता पुढील दिलासा मिळण्याची वाट न पाहता लगेच लिंक करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:13 PM2022-03-29T16:13:41+5:302022-03-29T16:15:00+5:30

Aadhaar-PAN Link: आता आधार-पॅन लिंकची शेवटची तारीख 31 मार्च आहे, त्यामुळे आता पुढील दिलासा मिळण्याची वाट न पाहता लगेच लिंक करा.

aadhaar pan linking is not mandatory for all read who all are exempt | 'या' लोकांसाठी Aadhaar-PAN Link करणे गरजेचे नाही, तुम्हीही यात सहभागी आहात का?

'या' लोकांसाठी Aadhaar-PAN Link करणे गरजेचे नाही, तुम्हीही यात सहभागी आहात का?

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21 अवघ्या 3 दिवसांनंतर संपणार आहे. अशा परिस्थितीत 31 मार्चपूर्वी पैसे, खाते, आधार-पॅनशी संबंधित अशी अनेक मोठी कामे आहेत, ज्यांना कोणत्याही किंमतीला सामोरे जावे लागेल. सरकार सातत्याने ग्राहकांना आधार-पॅन कार्ड लिंक करण्याचा सल्ला देत आहे. यापूर्वीही सरकारने अनेकवेळा मुदत वाढवून दिली आहे. 

आता आधार-पॅन लिंकची शेवटची तारीख 31 मार्च आहे, त्यामुळे आता पुढील दिलासा मिळण्याची वाट न पाहता लगेच लिंक करा. अन्यथा तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA नुसार, आधार आणि पॅन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 31 मार्च 2022 पूर्वी त्याचे आधार पॅनशी लिंक करावे लागेल. मात्र, असे काही लोक आहेत ज्यांना आधार आणि पॅन लिंक करण्याची गरज नाही.

या लोकांसाठी PAN-Aadhaar Link करण्याची गरज नाही...
- ज्यांच्याकडे Aadhaar Number किंवा Enrollment ID नाही.
- आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयातील रहिवाशांना याची गरज नाही.
-Income Tax Act 1961  नुसार अनिवासींसाठी अनिवार्य नाही.
- 80 वर्षांवरील नागरिकांसाठी आवश्यक नाही.
- जे भारताचे नागरिक नाहीत त्यांना याची गरज नाही.

या समस्यांना तोंड द्यावे लागेल...
तुम्ही वर नमूद केलेल्या कोणत्याही कॅटगरीमध्ये येत नसल्यास, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपूर्वी ते लिंक करावे लागतील. अन्यथा नागरिकांना आर्थिक व्यवहाराबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया...
- तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीची एफडी घेता येणार नाही.
- तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करू शकणार नाही.
- नवीन डेबिट-क्रेडिट कार्ड घेता येणार नाही.
- म्युच्युअल फंडात गुंतवणूक किंवा रिडीम करू शकणार नाही.
- तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कोणतेही विदेशी चलन खरेदी करू शकणार नाही.

कोणत्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता भासेल?
आधार-पॅन लिंक (Aadhaar-PAN Link) करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल.

Web Title: aadhaar pan linking is not mandatory for all read who all are exempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.