Lokmat Money > बिझनेस न्यूज > हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

अनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:23 AM2023-12-06T06:23:45+5:302023-12-06T06:24:29+5:30

अनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या.

Aadhaar update and...this month is important, complete this works; Don't push it to next year | हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

नवी दिल्ली : डिसेंबर हा यावर्षीची अखेरचा महिना आहे. आर्थिक घडामाेडींच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामे या डिसेंबरमध्ये उरकून घ्या. त्यात दिरंगाई झाल्यास बराच त्रास सहन करावा लागू शकताे. ही कामे काेणती? जाणून घेऊ या...

म्युच्युअल फंडातील नामांकन आवश्यक
म्युच्युअल फंडाच्या फाेलिओमध्ये नामांकन जाेडणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नामांकन नसेल तर १ जानेवारीपासून फाेलिओतून विक्री व इतर व्यवहार करता येणार नाही.

आधारचे अपडेट
आधार कार्ड काढून १० वर्षे झाली आणि एकदाही त्यातील माहिती अपडेट केलेली नाही, अशा लाेकांसाठी १४ डिसेंबरपर्यंत माेफत अपडेट करण्याची मुदत आहे. ऑनलाइन अपडेट माेफत करता येईल. त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क आकारण्यात येईल.

अग्रीम आयकर भरणा व आयकर विवरण
ज्यांचे आयकर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांना अग्रीम कर भरावा लागताे. अग्रीम कराचा तिसरा हप्ता भरण्यासाठी डिसेंबरची मुदत आहे. १५ डिसेंबरपूर्वी करदात्यांना ७५ टक्के अग्रीम कर भरणे बंधनकारक आहे. सुधारित आयकर भरणे किंवा आयकर भरण्यास उशीर झाला असेल तर ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ठराविक दंड भरून हे काम करता येईल.

याकडेही लक्ष असू द्या
अनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या.
आरबीआय ८ तारखेला पतधाेरण जाहीर करणार आहे. त्यात व्याजदर कायम ठेवण्याचा अंदाज आहे.

 

Web Title: Aadhaar update and...this month is important, complete this works; Don't push it to next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.