Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांसाठी LIC ची विशेष विमा पॉलिसी, दररोज 29 रुपयांची गुंतवणूक केल्यास होईल लाखोंचा फायदा

महिलांसाठी LIC ची विशेष विमा पॉलिसी, दररोज 29 रुपयांची गुंतवणूक केल्यास होईल लाखोंचा फायदा

aadhaarshila lic special insurance scheme : 1 फेब्रुवारी 2020 ला 'आधार शीला' पॉलिसी लाँच झाली. या योजनेत लाईफ कव्हरसोबतच (Life Cover) तुमची बचतही होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 03:52 PM2021-09-13T15:52:55+5:302021-09-13T15:57:06+5:30

aadhaarshila lic special insurance scheme : 1 फेब्रुवारी 2020 ला 'आधार शीला' पॉलिसी लाँच झाली. या योजनेत लाईफ कव्हरसोबतच (Life Cover) तुमची बचतही होते.

aadhaarshila lic special insurance scheme for women how many lakhs will be available on depositing 29 rupees daily | महिलांसाठी LIC ची विशेष विमा पॉलिसी, दररोज 29 रुपयांची गुंतवणूक केल्यास होईल लाखोंचा फायदा

महिलांसाठी LIC ची विशेष विमा पॉलिसी, दररोज 29 रुपयांची गुंतवणूक केल्यास होईल लाखोंचा फायदा

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (Life Insurance Corporation of India) नेहमी नवनवीन पॉलिसी सादर करत असते. यावेळी एलआयसीने महिलांसाठी एक नवी योजना आणली आहे, जी खूप लवकर लोकप्रिय झाली आहे. या पॉलिसीचे नाव 'आधार शीला' (aadhaarshila) असे आहे. या नावामध्ये आधारचा उल्लेख करण्यामागे ही एक विशेष कारण आहे. ज्या भारतीय नागरिक महिलेकडे आधार कार्ड आहे, त्या महिलेलाच आधार शीला या पॉलिसीचा फायदा घेता येतो.

1 फेब्रुवारी 2020 ला 'आधार शीला' पॉलिसी लाँच झाली. या योजनेत लाईफ कव्हरसोबतच (Life Cover) तुमची बचतही होते. या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपयांची गुंतवणूक केली तर ती मॅच्युअर झाल्यावर त्या महिलेला 4 लाख रुपये मिळतील. या योजनेचा काळ सुरू असताना तुम्हाला कर्जही घेता येऊ शकते.

किती कालावधीसाठी घेऊ शकता 'ही' पॉलिसी?
8 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतची महिला ही पॉलिसी खरेदी करू शकते. कमीतकमी 10 आणि जास्तीत जास्त 20 वर्षांपर्यंत (Minimum and Maximum) या पॉलिसीत गुंतवणूक केली जाऊ शकते. तसंच ही पॉलिसी जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा महिलेचं वय 70 वर्षांहून अधिक असता कामा नये.

विमा रक्कम
या योजनेमध्ये कमीतकमी 75 हजार रुपयांचा तर जास्तीतजास्त 30 लाख रुपयांचे विमा कवच तुम्हाला घेता येऊ शकते, यात तुम्ही ॲक्सिडेंट बेनिफिटचा रायडर घेऊ शकता.

किती भरावा लागेल प्रीमियम?
जर एखाद्या मुलीचे वय 20 वर्षं आहे आणि तिने 20 वर्षांच्या काळासाठी आधार शीला ही पॉलिसी विकत घेतली आणि 3 लाख रुपयांचा विमा उतरवला तर तिला वर्षाला साधारण 10 हजार 868 रुपये प्रीमियम (Policy Premium) भरावा लागेल. त्याच्या पुढच्या वर्षी हा प्रीमियम कमी होऊन 10 हजार 649 रुपये इतका होईल. 

मॅच्युरिटी बेनिफिट
विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तिला 4 लाख रुपये मॅच्युरिटी बेनिफिट आणि विम्याची रक्कम आणि रॉयल्टी बोनस म्हणून 2 लाख रुपये मिळतील.

प्रीमियम पेमेंट
आधार शीला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम हप्ता भरू शकता. जर तुम्ही प्रीमियम भरायला विसरलात तर तुम्हाला 1 महिन्याचा ग्रेस पीरियड (Grace Period) मिळेल. पण जर तुम्ही दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला हप्ता भरायचे ठरवले तर तुम्हाला 15 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळेल.

कॅश बेनेफिट
पॉलिसी सुरु झाल्यानंतर 5 वर्षांत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला सम अशुअर्ड रक्कम मिळेल पण जर त्यानंतर विमा धारकाचा मृत्यू झाला तर वारसाला अश्युअर्ड रक्कम (Sum Assured) आणि रॉयल्टी बोनस दोन्हीही मिळेल. 

सेटलमेंट
तुम्ही जितक्या वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली आहे ती मुदत संपल्यानंतर तुम्ही सगळी रक्कम एकदम घेऊ शकता किंवा हप्त्याहप्त्यांनी ही रक्कम घेऊ शकता.

सरेंडर 
जर तुम्ही सलग दोन वर्षं प्रीमियम भरू शकला नाहीत तर तुमची पॉलिसी कधीही सरेंडर करता येईल.
 

Web Title: aadhaarshila lic special insurance scheme for women how many lakhs will be available on depositing 29 rupees daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.