Join us

कामाची बातमी! आधार कार्डबाबत मोठी अपडेट,'हे' काम केले नाहीतर अनेक कामे रखडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 3:00 PM

सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सध्या प्रत्येक सरकारी कामात आधारकार्ड महत्वाचे आहे, आधारकार्ड नसेलतर काही कामे होत नाहीत.

सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सध्या प्रत्येक सरकारी कामात आधारकार्ड महत्वाचे आहे, आधारकार्ड नसेलतर काही कामे होत नाहीत. म्हणूनच आपले आधारकार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. अनेकांच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख, लिंग आणि नाव किंवा आडनाव अपडेट केले जात नाही, यात मोबाईल नंबरही नसतात. त्यामुळे तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. 

आधारकार्डची सरकारी योजनेशिवाय आजकाल खासगी क्षेत्रातही तितकीच गरज आहे. सध्या आधार कार्डच्या माध्यमातून अनेक प्रकारची फसवणूक होत आहे. त्यामुळे युआयडीएआय ने ट्विटद्वारे ई-मेल लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

या संदर्भात युआयडीएआयने ट्विट करुन माहिती दिली आहे. आधार कार्ड आपल्या ई-मेल आयडीशी लिंक करण्याच्या यात सूचना दिल्या आहेत. यामुळे आपला फायदा होणार असल्याचे यात म्हटले आहे. तुम्ही ज्यावेळी तुमचे आधारकार्ड वापराल त्यावेळी तुम्हाला ई-मेलवरती अलर्ट केले जाईल. ज्यावेळी तुमच्या आधारकार्डचा चुकीचा वापर होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीद्वारे मेसेज पाठवला जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमची फसवणूक होत असल्याचे कळेल.

जर तुम्ही तुमच्या मेल आयडीने आधार अपडेट केले, तर तुमचा आधार कोणत्याही अनावश्यक कामासाठी तर वापरला जात नाही ना हे तुम्ही सहज शोधू शकाल. तसेच जेव्हा तुमचा आधार कुठेही वापरला जाईल, तेव्हा तुम्हाला त्याचा अलर्ट मिळेल. सध्या आधारकार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचे समोर आले आहे. 

तुम्हाला जर तुमचा ई-मेल आयडी आधारकार्डमध्ये अपडेट करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. 

टॅग्स :आधार कार्ड