Aadhar Housing Finance IPO: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकस्टोन (Blackstone) समर्थित कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ (Aadhar Housing Finance Limited) आजपासून खुला झाला आहे. मे महिन्यात येणाऱ्या मेनलाइन सेगमेंटच्या ३ आयपीओपैकी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओसाठी आजपासून अर्ज करता येणारे.
हाऊसिंग फायनान्स कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ३,००० कोटी रुपयांचा आयपीओ ८ मे रोजी सुरू होत आहे आणि १० मे रोजी बंद होईल. गेल्याच महिन्यात बाजार नियामक सेबीने कंपनीला आयपीओ आणण्यास मान्यता दिली होती.
रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स (आरएचपी) नुसार, कंपनीचा आयपीओ क्यूआयबी अंतर्गत अँकर गुंतवणूकदारांसाठी ७ मे रोजी खुला झाला. कंपनीनं इश्यू साइझच्या ५० टक्के भाग पात्र क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (QIB)) राखीव ठेवला आहे. या इश्यूमध्ये १५ टक्के नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII-non-institutional investors) आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदार हिस्सा खरेदी करू शकतील.
कोणाचा किती हिस्सा?
१८,०३५.५७ कोटी रुपयांची मालमत्ता असलेली कंपनी (३१ डिसेंबर २०२३ पर्यंत) १,००० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्ससाठी नवीन इश्यू जारी करेल, तर २,००० कोटी रुपयांचा इश्यू ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) जारी केले जातील. ब्लॅकस्टोन ग्रुपद्वारे समर्थित प्रमोटर कंपनी बBCP Topco VII Pte Ltd ओएफएस आणणार आहे. कंपनीनं पाच हजार कोटी रुपयांचे इश्यू मांडण्याची योजना आखली असली तरी डीएचआरपी दाखल करताना कंपनीनं ती कमी करून तीन हजार कोटी रुपये केली.
किती करावी लागेल गुंतवणूक
Aadhar Housing Finance IPO चं अलॉटमेंट १३ मे रोजी होणार असून १४ मे रोजी शेअर्स अकाऊंटमध्ये क्रेडिट केले जातील. कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग १५ मे रोजी होईल. कंपनीच्या एका लॉटमध्ये ४७ शेअर्स असून किमान १४८०५ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)