Join us

Aadhar Update: आता आधार लिंक्ड पेमेंट सिस्टममध्ये होणार मोठे बदल; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:53 AM

देशात प्रत्येक नागरिकाला आता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. तसेच हे आधारकार्ड बँकांना जोडण्यात आले आहे, याद्वारे डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही ठिकाणी खोट्या आधारकार्डचा वापर करुन फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात प्रत्येक नागरिकाला आता आधारकार्ड अनिवार्य केले आहे. तसेच हे आधारकार्डबँकांना जोडण्यात आले आहे, याद्वारे डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही ठिकाणी खोट्या आधारकार्डचा वापर करुन फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता आधार इनेबेल्ड पेमेंट सिस्टममध्ये कोणतेही फसवे व्यवहार करता येणार नाहीत, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एईपीएस'मध्ये मोठे बदल केले आहेत. ही सुविधा आणखी सुरक्षित करण्यात आली आहे. 

'फिंगरप्रिंट लाइव्हलाईनेस' नावाचे हे नवीन फिचर यात जोडण्यात आले आहे. याद्वारे बनावट बोटांचे ठसे ओळखता येणार आहेत. गेल्या काही दिवसापासून सिलिकॉन पॅड्सवर बनवलेल्या फिंगरप्रिंटचा वापर करून आर्थिक फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यानंतर आधारने यात मोठा बदल केला आहे.

Aadhaar Card : आधार कार्डबाबत UIDAI ने दिले 'हे' मोठे अपडेट! जाणून घ्या, अन्यथा...

आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम एक बँक आधारीत मॉडेल आहे. यात आधार आधारीत बायोमेट्रीक ऑथेंटीफिकेशनचा वापर करुन पेसै काढले जातात. यात बँक ग्राहक आपले आधारला जोडलेल्या बँक अकाऊंटवर बिझनेस व्यवहाराची रोख ठेव, रोख पैसे काढणे, आंतरबँक आणि आंतर बँक रोख व्यवहारांची चौकशी यासारख्या कामे करु शकता. 

नवे सुरक्षा फिचर एईपीएस पॉइंट ऑफ सेल मशीनमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. यात फिंगरप्रिंट केले असता पीओएसला कळेल की वापरले जाणारे फिंगरप्रिंट जिवंत व्यक्तीचे आहे की नाही. हे नवे फिचर सुरु झाल्यापासून, आतापर्यंत १,५०७ कोटींहून अधिक बँकिंग व्यवहार झाले आहेत. यापैकी ७.५४ लाख फसवणूकीचे व्यवहार या प्रणालीद्वारे समोर आले आहेत.देशभरात एईपीएस च्या गैरवापराच्या अनेक प्रकरणानंतर हे सुरक्षा फिचर सुरू करण्यात आले आहे.

Aadhaar मध्ये होणार मोठा बदल, आता १० वर्षांनंतर करू शकाल 'हे' महत्त्वाचं काम

नवीन सुरक्षा फिचरमुळे फसवणुकीला आळा बसणार आहे. बनावट बोटांचे ठसे हे लगेच ओळखणार आहे, त्यामुळे देशभरात आतापर्यंत आधारकार्डचा होणारा गैरवापराला आळा बसणार आहे.काही दिवसापूर्वी फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.एका अहवालानुसार, सध्या देशात सरकारकडे सुमारे ५० लाख आधार सक्षम पीओएस मशीन आहेत.

टॅग्स :आधार कार्डबँक