Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका शेअरवर 293 रुपये कमावण्याची संधी; कंपनीने केली बायबॅकची घोषणा...

एका शेअरवर 293 रुपये कमावण्याची संधी; कंपनीने केली बायबॅकची घोषणा...

Share Buyback : बायबॅकसाठी 5 सप्टेंबर 2024 तारीख निश्चित केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:23 PM2024-08-26T18:23:55+5:302024-08-26T18:24:23+5:30

Share Buyback : बायबॅकसाठी 5 सप्टेंबर 2024 तारीख निश्चित केली आहे.

Aarti Drugs Share Buyback : Opportunity to earn Rs 293 per share | एका शेअरवर 293 रुपये कमावण्याची संधी; कंपनीने केली बायबॅकची घोषणा...

एका शेअरवर 293 रुपये कमावण्याची संधी; कंपनीने केली बायबॅकची घोषणा...

Share Buyback : फार्मास्युटिकल कंपनी आरती ड्रग्जच्या (Aarti Drugs) शेअर्समध्ये सोमवारी (26 ऑगस्ट) 12 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली. कंपनीने केलेल्या बायबॅकच्या घोषणेनंतर ही ही वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर बायबॅक (Aarti Drugs Share Buyback) ला मंजुरी दिली आहे. बायबॅकसाठी कंपनी ₹59.85 कोटी खर्च करेल.

आरती ड्रग्ज शेअर बायबॅक
आरती ड्रग्ज टेंडर ऑफरद्वारे शेअर्स बायबॅक करेल. एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, टेंडर ऑफरद्वारे 6.65 लाख शेअर्स बायबॅक केले जाईल. बायबॅक प्रति शेअर ₹ 900 च्या किमतीवर असेल. कंपनीचा शेअर सध्या 606.35 रुपयांवर आहे. म्हणजेच, भागधारकांना एका शेअरवर 293 रुपये नफा मिळणार आहे. बोर्डाने शेअर बायबॅकसाठी 5 सप्टेंबर 2024 ही तारीख निश्चित केली आहे.

शेअर बायबॅक म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी स्वतःच्या भांडवलामधून स्वतःचे शेअर्स खरेदी करते, तेव्हा त्याला शेअर बायबॅक म्हणतात. बायबॅक म्हणजे शेअर्सचे भाव बाजारात कमी होत असल्याचा कंपनीचा विश्वास आहे. शेअर बायबॅकमुळे कंपनीचे भागभांडवल कमी होते. बाजारातून परत विकत घेतलेले शेअर्स नाकारले जातात. बायबॅक शेअर्स पुन्हा जारी केले जाऊ शकत नाहीत.

आरती ड्रग्सच्या शेअरची कामगिरी
कंपनीच्या स्टॉकमध्ये एका आठवड्यात 15 टक्के, 2 आठवड्यात 19 टक्के आणि 3 महिन्यांत 23 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकमध्ये 18 टक्के आणि या वर्षी आतापर्यंत 22 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, स्टॉक गेल्या एका वर्षात 12 टक्के आणि गेल्या दोन वर्षांत 38 टक्के वाढला आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 632.10 आणि निच्चांक 430 रुपेये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 5,574.48 कोटी रुपये आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Aarti Drugs Share Buyback : Opportunity to earn Rs 293 per share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.