नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे फेरनिवड झालेले सीईओ सलिल पारेख यांच्या पगारात दणदणीत वाढ करण्यात आली आहे. सलिल पारेख यांचे पगार पॅकेज थेट ४२.५० कोटी रुपयांवरून ७९.७५ कोटी रुपये झाले असून, पगारात वाढ ८८ टक्के इतकी करण्यात आली आहे.
पारेख २०१८ पासून इन्फोसिसमध्ये...
पारेख यांनी जानेवारी २०१८ मध्ये इन्फोसिसचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी कॅपजेमिनीमध्ये २५ वर्षे काम केले आहे.
कामाचे दाम...सीईओच्या पगारात वाढ करताना सॉफ्टवेअर कंपनीने सांगितले की, सलिल यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने मोठी प्रगती केली आहे. पारेख यांच्या पगारवाढीचा हा निर्णय त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्याच्या घोषणेनंतर घेण्यात आला आहे.
सीईओंचे वार्षिक वेतनसलिल पारेख (इन्फोसिस) ७९.७५ कोटीथियरी डेलापोर्ट (विप्रो) ६४.३४कोटीसी. विजयकुमार (एचसीएल टेक) ३२.२१ कोटीराजेश गोपीनाथन (टीसीएस) २५.७६ कोटीसी. पी. गुरनानी (टेक महिंद्रा) २२कोटी