Join us

दोन वर्षांत जीडीपी जवळपास ८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:17 AM

येत्या दोन वर्षांत सकल देशी उत्पादन (जीडीपी) जवळपास ८ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा उद्योग वर्तुळाने व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत सकल देशी उत्पादन (जीडीपी) जवळपास ८ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा उद्योग वर्तुळाने व्यक्त केली आहे. आर्थिक सुधारणांची कणखर प्रक्रिया आणि घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीचा पाया या वाढीला लाभलेला असेल, असे भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आपल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या महत्वाच्या सुधारणांशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आता बुहश: स्थिरावली असून उद्योग क्षेत्र गुंतवणुकीच्या नव्या टप्प्यासाठी तयार झाले आहे. नुकतीच ५० हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झालेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जनमत चाचण्यांत ८२ टक्के सीईओजनी जीडीपी वर्ष २०१८-२०१९ वर्षात सात टक्क्यांपेक्षा जास्त असेल व त्यांच्यापैकी दहा टक्क्यांनी तो साडेसात टक्क्यांच्या वर असेल, असे म्हटले. येत्या दोन वर्षांत जीडीपी जवळपास ८ टक्क्यांचा असेल, असे उद्योग वर्तुळाला वाटते.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतबातम्या