Join us  

वेतनातील असमानतेबद्दल ९०% कर्मचाऱ्यांची तक्रार

By admin | Published: September 08, 2015 12:33 AM

भारतातील कंपन्यांमध्ये वेतनाच्या बाबतीत कर्मचारी समाधानी नाहीत. समान जबाबदारी आणि पद असूनही वेतन मात्र भिन्न असल्याचे मत ९० टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : भारतातील कंपन्यांमध्ये वेतनाच्या बाबतीत कर्मचारी समाधानी नाहीत. समान जबाबदारी आणि पद असूनही वेतन मात्र भिन्न असल्याचे मत ९० टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. तथापि, कंपन्या मर्जीतील व्यक्तीला अधिक वेतन देत अशी तक्रारही आहे.जॉबज् डॉट इनच्या या सर्वेनुसार अनेक कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की, बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपन्या जास्त वेतन देतात, तर आपल्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यालाही अधिक लाभ देतात. टाइम्स जॉब डॉट कॉमचे मुख्य परिचालन अधिकारी विवेक मधुकर यांच्या मतानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात किंवा त्यांच्या इतर प्रश्नांबाबत लक्ष देण्याची गरज आहे. कारण याचा थेट प्रभाव हा कर्मचाऱ्याच्या कामावर तर होतोच; पण उत्पादन व एकूणच कंपनीवर याचा परिणाम होऊ शकतो.सर्वेक्षणानुसार ४० टक्के कर्मचाऱ्यांना असे वाटते की, बाहेरून नियुक्त केल्या गेलेल्या कर्मचाऱ्याला अधिक लाभ देण्यात आला आहे आणि वेतनातील असमानतेचे हे एक प्रमुख कारण आहे, तर ३५ टक्के कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की, कंपन्या आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यालाचा झुकते माप देत असल्यामुळे वेतनात भिन्नता आहे.५ टक्के कर्मचारी म्हणतात, वेतन असमान राहणारचपाच टक्के कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की, प्रत्येक कर्मचाऱ्याचे चांगले काम हेच त्या कर्मचाऱ्यासाठी लाभदायक ठरते आणि साहजिकच त्यामुळे वेतनात भिन्नता तर राहणारच. टाइम्स जॉब डॉट कॉमचे अधिकारी विवेक मधुकर म्हणतात की, वेतनातील या त्रुटी दूर करण्यासाठी कंपन्यांनी सर्व्हे करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात जी भिन्नता आहे ती दूर केली गेली पाहिजे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांनाही कामात उत्साह वाटेल.