Join us

अबब... १०० अब्ज डॉलर; 'टाटा'नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:07 AM

रिलान्यस इंडस्ट्रीजचा मार्केट कॅपमधील 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये समावेश झाल्याने रिलायन्सने उद्योग क्षेत्रात इतिहास रचला आहे.

मुंबई - रिलायन्स उद्योग समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानींनी अनेक नवनवीन घोषणा केल्या. अंबानींच्या या घोषणेमुळे केवळ सर्वसामान्य नागरिकच खुश झाले नाहीत, तर शेअर बाजारातही याचा परिमाण दिसून आला. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. त्यामुळेच रिलान्यस इंडस्ट्रीजचा मार्केट कॅपमधील 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये समावेश झाल्याने रिलायन्सने उद्योग क्षेत्रात इतिहास रचला आहे.

टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसनंतर 100 अब्ज डॉलरच्या (6.93 लाख करोड रुपये) क्लबमध्ये समावेश होणारी, रिलायन्स ही दुसरी कंपनी भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्सच्या एजीएमनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी सेन्सेक्समध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर निफ्टी 50 मध्येही कंपनीच्या शेअर्सने उसळी घेतली आहे. रिलायन्सने महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एजीएममध्ये काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये जिओ फोन 2 आणि गिगाफायबर सुरु करण्यासह अन्य घोषणाही करण्यात आल्या. दरम्यान, मार्केट कॅपिटलायझेशनच्या क्लबमध्ये सामिल होणारी टीसीएस ही पहिली कंपनी आहे. 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी