Join us

Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 7:23 PM

भारतात Accenture मध्ये सुमारे 2 लाख कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देकंपनीच्या कर्मचारी कपातीचा परिणाम भारतात सुद्धा होणार आहे.

बंगळुरू : ग्लोबल टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी फर्म एक्सेंचर  (Accenture) जगभरातील सुमारे 25,000 लोकांना किंवा ग्लोबल वर्कफोर्सच्या जवळपास 5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची शक्यता आहे. कंपनीच्या कर्मचारी कपातीचा परिणाम भारतात सुद्धा होणार आहे.

ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने याबाबत ऑगस्टमध्ये सूचित केले होते. Accenture चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युली स्वीट यांनी कर्मचार्‍यांच्या बैठकीचा हवाला देत कपातीबाबात सांगितले होते, असे ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने म्हटले आहे.

भारतात Accenture मध्ये सुमारे 2 लाख कर्मचारी आहेत, जे कंपनीला टेक्नॉलाजीसाठी कर्माचाऱ्यांचे हब बनवते. त्याचबरोबर, जगभरात कंपनीचे 5 लाख कर्मचारी आहेत. दरम्यान, Accenture इंडियाच्या प्रवक्त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूने म्हटले आहे की, या महिन्यात इंटरनल ग्लोबल स्टाफ मीटिंग ऑनलाइन स्ट्रीम केले आहे. ज्यामध्ये सबकॉन्ट्रॅक्ट्स आणि नवीन भरती थांबविण्याशिवाय कंपनीला अजूनही कर्मचारी कमी करण्याची आवश्यकता आहे, असे Accenture च्या ज्युली स्वीट यांनी म्हटले होते. 

रिपोर्टनुसार, चार्जेबिलिटी किंवा कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांचे वेतन, एका दशकात पहिल्यांदा 90 टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. तसेच, परफॉर्मन्स मॅट्रिक्सचा वापर करून कर्मचार्‍यांना कमी करण्याचे लक्ष्य ठेवले जात आहे, असे ज्युली स्वीट यांनी म्हटले होते.

आणखी बातम्या...

"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र     

धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

टॅग्स :तंत्रज्ञानव्यवसाय