Join us  

दोन लाख व त्यापेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारताना

By admin | Published: April 10, 2017 12:39 AM

दोन लाख व त्यापेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारताना

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १ एप्रिल २०१७ पासून नगदी विक्रीचा व्यवहार करताना आयकरात लोकामध्ये खूप संभ्रम निर्माण झाला आहे. रोख व्यवहार करताना काय काळजी घ्यावी लागेल, हे सांगा?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, नगदी व्यवहार वाढल्यास, करचोरी होते असे शासनाला वाटते. नगदी खरेदी-विक्री, खर्च, गुंतवणूक, देणी-घेणी अशा प्रत्येक स्तरावर जाचक निर्बंध आहेत. आयकरात हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे.अर्जुन : कृष्णा, आयकरात नगदी विक्रीवर काय निर्बंध आहेत?कृष्ण : अर्जुना, नगदी रु. २ लाख किंवा जास्त रक्कम स्वीकारल्यास, १०० टक्के दंड स्वीकारणाऱ्यास लागणार आहे. एका व्यक्तीस, किंवा एका दिवशी किंवा एका व्यवहारावर २ लाख किंवा जास्त रक्कम असल्यास दंड बसेल. याचा अर्थ चार नियम लक्षात घ्यावे. १) ज्यात रु. २ लाख किंवा जास्त, २) एक व्यक्ती, ३) एक दिवस आणि ४) एक व्यवहार असे चार नियम पाळावे. नगदी रु. २ लाख किंवा जास्त रक्कम स्वीकारल्यास, १०० टक्के दंड स्वीकारणाऱ्यास लागणार आहे. एका व्यक्तीस, किंवा एका दिवशी किंवा एका व्यवहारावर २ लाख किंवा जास्त रक्कम असल्यास दंड बसेल. याचा अर्थ चार नियम लक्षात घ्यावे. १) ज्यात रु. २ लाख किंवा जास्त, २) एक व्यक्ती, ३) एक दिवस आणि ४) एक व्यवहार असे चार नियम पाळावे.अर्जुन : कृष्णा, ‘‘एका व्यक्तीस’’ याचा काय अर्थ आहे?कृष्ण : अर्जुना, एका व्यक्तीस २ लाख रुपयांचा निर्बंध याचा अर्थ एका दिवसात एका व्यक्तीस २ लाख किंवा जास्त रोख विक्री करता येणार नाही. उदा. ‘‘अ’’ नावाच्या ग्राहकास १ नंबरचे बिल १ लाखाचे, त्याच दिवशी ४ नंबरचे बिल रु. १.५ लाखाचे अशी एका दिवसात एकूण नगदी विक्री ‘‘अ’’ ला २.५ लाख रु. होते. अशा नगदी विक्रीवर विक्रेत्याला दंड लागेल.अर्जुन : कृष्णा, ‘‘एका दिवसाचा’’ काय अर्थ आहे? कृष्ण : अर्जुना, एका व्यक्तीकडून एका दिवसात २ लाख किंवा जास्त रक्कम नगदी स्वरूपात घेतल्यास दंड बसेल. उदा. ‘‘अ’’ नावाच्या ग्राहकास १ लाखाची उधारी विक्री ८ तारखेला केली. ९ तारखेला २ लाखांची उधारीवर त्याला विक्री केली. १० तारखेला ‘‘अ’’ ने रोख ३ लाख रुपये नगदी दिल्यास विक्रेत्यास दंड लागेल.अर्जुन : कृष्णा, ‘‘एका व्यवहार’’ चा काय अर्थ आहे?कृष्ण : अर्जुना, एका व्यवहारावर २ लाख किंवा जास्त रकमेचा निर्बंध याचा अर्थ असा की, विक्री बिलाची रक्कम २ लाख किंवा जास्त अथवा नगदी २ लाख किंवा जास्त पैसे मिळाल्यास तो एक व्यवहार यात मोडतो. बँकद्वारे वा काही रक्कम चेकद्वारे मिळाल्यास तरी ते चालणार नाही. उदा. ‘‘अ’’ नावाच्या व्यक्तीला २.५ लाखाची विक्री २० तारखेला केली. २२ तारखेला त्या ग्राहकाने २.२५ लाख चेकद्वारे उधारीवर आणि २५ हजार नगदी दिले तरी विक्रेत्यास दंड लागेल. कारण एक व्यवहार २ लाखांच्या वर गेला आहे.अर्जुन : म्हणजे २ लाखांच्यावर विक्री बिल अथवा वसुली नगदी स्वरूपात करूच नये का?कृष्ण : अर्जुना, होय! एक बिल २ लाखांपेक्ष जास्त एका दिवसाला, एका व्यक्तीला व त्याची वसुली नगदी स्वरूपात करू नये अन्यथा अडचण होईल. २ लाखांपेक्षा कमी व्यवहार असल्यास दंड टाळू शकाल. उदा. ‘‘अ’’ ग्राहकाला ५ तारखेला १.५ लाखाची विक्री केली व त्याच दिवशी १.५ लाख रोख मिळाले तर अडचण नाही. त्याच ‘‘अ’’ ६ तारखेला १.७५ लाखाची विक्री आणि त्याच दिवशी रोख रक्कम १.७५ लाख मिळाली तरी अडचण नाही. परंतु प्रत्येकाने असे नगदी व्यवहार टाळल्यास चांगले. अन्यथा अशी सवय लागून पुढे अडचण निर्माण होईल असे करणे टाळावे. अर्जुन : कृष्णा, बँक खात्यात २ लाख किंवा जास्त जमा, नावे नगदी स्वरूपात करावे का?कृष्ण : अर्जुना, नुकतेच ५ एप्रिल २०१७ रोजी आयकर विभागाने खुलासा दिला आहे की, को-आॅप बँक, पोस्ट आॅफिस यांच्यासोबत २ लाख व जास्त नगदी जमा अथवा उचल केल्यास दंड लागणार नाही. हा संभ्रम दूर झाला आहे. तसेच खालील व्यवहारावर हे निर्बंध लागू होत नाही. जसे १) शासन. २) इतर व्यक्ती, शासनाने नमूद केल्यास अशांना २ लाख किंवा जास्त रक्कम स्वीकारता येईल.अर्जुन : कृष्णा, या नगदी व्यवहाराच्या निर्बंधावरून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, १ एप्रिल २०१७ पासून नगदी व्यवहार जपूनच करावे. गिफ्ट, ई. नगदी २ लाख वा जास्त स्वीकारल्यास दंड लागेल. याचा परिणाम ज्वेलर्स, भुसार विक्रेते, हॉस्पिटल, बिल्डर्स, मालमत्ता खरेदी विक्री इ. जेथे नगद व्यवहार जास्त चालतो तेथे होईल. तसेच रोख खरेदी वा खर्च १० हजार किंवा जास्त एका दिवसा चालणार नाही. अगोदर ही मर्यादा रु. २० हजार होती. बँकेद्वारेच व्यवहार करावा. कायदेही खूप जाचक व कडक होत आहे. काळा पैसा/बेहिशोबी नगदी पैशावर शासन निर्बंध आणत आहे. नवीन आयकर विवरणातदेखील नोटबंदीसंबंधी नगदी व्यवहाराची माहिती द्यावी लागेल. दिवसेंदिवस यापुढे रोख व्यवहार कमी करावे व करदात्याने शांततेने झोपावे अन्यथा त्रास होऊ शकतो.