नागपूर : महापालिका निवडणुका सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतला आहे. शासन यासंदर्भात दुसरा निर्णय घेत नाही तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्डनुसार होणार की प्रभाग पद्धतीनुसार होणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. आजच्या घडीला निवडणूक झाली तर ती वॉर्ड पद्धतीनुसारच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु सोबतच पुढे शासन कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही, अशी पुष्टीही जोडली. राज्यात डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत.
इव्हीएम मशीनवर उमेदवारांचा फोटो
काही राज्यांमध्ये इव्हीएम मशीनवर उमेदवारांचे छायाचित्र वापरण्याचा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातही तसा प्रयोग करण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे सहारिया यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महापालिका निवडणुका वॉर्डनुसारच
महापालिका निवडणुका सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतला आहे. शासन यासंदर्भात दुसरा निर्णय घेत नाही तोपर्यंत तरी
By admin | Published: October 6, 2015 01:50 AM2015-10-06T01:50:10+5:302015-10-06T01:50:10+5:30