Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिस्त्रींचे टाटांवरील आरोप तथ्यहीन

मिस्त्रींचे टाटांवरील आरोप तथ्यहीन

रतन टाटा यांना टाटा उद्योग समूहातील कंपन्यांबाबत देण्यात आलेली माहिती इन्सायडर ट्रेडिंगविषयक नियमांच्या अधीनच

By admin | Published: January 24, 2017 12:49 AM2017-01-24T00:49:10+5:302017-01-24T00:49:10+5:30

रतन टाटा यांना टाटा उद्योग समूहातील कंपन्यांबाबत देण्यात आलेली माहिती इन्सायडर ट्रेडिंगविषयक नियमांच्या अधीनच

Accusations of Mistry on Tatten | मिस्त्रींचे टाटांवरील आरोप तथ्यहीन

मिस्त्रींचे टाटांवरील आरोप तथ्यहीन

मुंबई : रतन टाटा यांना टाटा उद्योग समूहातील कंपन्यांबाबत देण्यात आलेली माहिती इन्सायडर ट्रेडिंगविषयक नियमांच्या अधीनच आहेत. या माहितीमुळे कोणताही नियमभंग झालेला नाही, असा निष्कर्ष भांडवली बाजार नियामक सेबीने काढला आहे. टाटा समूहाचे पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी टाटांवर नियमभंग केल्याचा आरोप केला होता.
१४ जानेवारी रोजी सेबीच्या बोर्डाची बैठकीत झाली. या बैठकीत मिस्त्री यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचा निष्कर्ष बोर्डाने काढला. बैठकीतील इतिवृत्तात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद चेअरमन होते. मानद चेअरमनसोबत कंपनीची कामगिरी, विलिनीकरण, अधिग्रहण, निर्गुंतवणूक आणि अन्य संवेदनशील माहिती चर्चिली जाऊ शकते. मानद चेअरमनसारख्या अनुभवी व्यक्तीचा कंपनीला लाभच होऊ शकतो. त्यासाठीच त्याला या पदावर नेमलेले असते. अशा व्यक्तीने कंपनी सोडलेली असली तरी त्याची विषयांतील जाण कंपनीसाठी अमूल्य असते. काही वेळा बोर्ड आणि समित्यांच्या बैठकांशी संबंधित कार्यक्रम पत्रिका आणि अन्य संवेदनशील माहिती अशा व्यक्तीला दिली जाऊ शकते. त्यामुळे टाटांसोबत याबाबतीत झालेला सर्व प्रकारचा संवाद नियमित स्वरूपाचाच ठरतो.
या प्रकरणी सेबी, रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. मानद चेअरमनसारख्या पदावरील व्यक्तीशी शेअर्सच्या किमतींवर परिणाम करू शकणारी माहितीचेही आदानप्रदान केले जाऊ शकते, असे सेबीच्या इतिवृत्तात म्हटले आहे.
सायरस मिस्त्री यांची टाटा उद्योग समूहाच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मिस्त्री यांनी २0 डिसेंबर रोजी रतन टाटा यांच्या विरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका दाखल केली होती. रतन टाटा यांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापकीय अधिकार नसताना उद्योग समूहाच्या निर्णयांत हस्तक्षेप केला. तसेच शेअर बाजारातील किमतींवर प्रभाव पाडू शकणारी संवेदनशील माहिती समूहाकडून हस्तगत केली, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Accusations of Mistry on Tatten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.