Join us

ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला अच्छे दिन; ३९.५ लाख कारची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 5:42 AM

‘फाडा’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये ३६.४० लाख कार विकल्या गेल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये ३९.४८ लाख कारची विक्री झाली असून वार्षिक आधारावर कार विक्रीत ८.४५ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती वाहन वितरकांची शिखर संस्था ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) दिली आहे.

‘फाडा’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये ३६.४० लाख कार विकल्या गेल्या होत्या. गेल्या महिन्यात ३.२२ लाख कारची विक्री झाली. २०२३ च्या मार्चमधील ३.४३ लाख कार विक्रीच्या तुलनेत हा आकडा ६.१७ टक्के कमी आहे. अहवालानुसार, वित्त वर्ष २०२४ मध्ये ९.३० टक्के वाढीसह १.७५ कोटी दूचाकी वाहनांची विक्री झाली. आदल्या वित्त वर्षात हा आकडा १.६ कोटी होता. वित्त वर्ष २०२४ मध्ये किरकोळ वाहन विक्रीत १० टक्के वाढ झाली. दुचाकी, तीनचाकी, कार, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत अनुक्रमे ९ टक्के, ४९ टक्के, ८.४५ टक्के, ८ टक्के आणि ५ टक्के वाढ झाली आहे. तीनचाकी, कार आणि ट्रॅक्टरच्या विक्रीचा नवा उच्चांक झाला आहे.

टॅग्स :कारवाहन उद्योग