Join us

वित्तीय तुटीचे ९१ टक्के उद्दिष्ट सप्टेंबरमध्येच पूर्ण; सहामाहीत ६.२३ लाख कोटींची कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 1:46 AM

चालू वित्तवर्षात वित्तीय तूट ५.४६ लाख कोटींच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले होते. तथापि, पहिल्या सहामाहीत म्हणजेच सप्टेंबरपर्यंतच ती ४.९९ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

नवी दिल्ली : चालू वित्तवर्षात वित्तीय तूट ५.४६ लाख कोटींच्या आत ठेवण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले होते. तथापि, पहिल्या सहामाहीत म्हणजेच सप्टेंबरपर्यंतच ती ४.९९ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. याचाच अर्थ सप्टेंबरपर्यंतच वित्तीय तूट संपूर्ण वर्षातील उद्दिष्टाच्या ९१.३ टक्के झाली आहे. दरम्यान, याच काळातील महसुली तूटही ९१.९ टक्के इतकी आहे.भारताच्या महालेखापालांनी (सीजीए) मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. त्यानुसार चालू वित्तवर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहा महिन्यांतील करातून मिळालेला महसूल 6.23 लाख कोटी रुपये राहिला.अर्थसंकल्पातील अंदाजाच्या तुलनेतहा महसूल अवघा४१.१ टक्केच आहे.या काळातीलसरकारची एकत्रित मिळकत(कर महसूल आणि कर्जेतर भांडवल)6.50लाख कोटी राहिली.अर्थसंकल्पातील अंदाजाच्या ती४0.६ टक्केइतकीच आहे.२0१७-१८ या वित्तवर्षात वित्तीय तूट ५.४६ लाख कोटी राहील, असे गृहीत धरण्यात आले होते. आदल्या वर्षीची तूट5.34लाख कोटी होती.एप्रिल ते सप्टेंबर या काळात सरकारचा एकूण खर्च11.49लाख कोटी राहिला.संपूर्ण वित्तवर्षातील अपेक्षित खर्चाच्या तुलनेत हा खर्च 53.5 % आहे.याच काळातील महसुली तूट ३.८ लाख कोटी राहिली.अंदाजाच्या तुलनेत ती९१.९ टक्के आहे.एप्रिल ते आॅगस्ट या काळातील वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ९६.१ टक्के होती.सप्टेंबरमध्ये ती थोडी कमी झाली आहे. पुढील महिन्यात ती आणखी कमी कमी होत जाईल.चालू वित्तवर्षात वित्तीय तूट राष्टÑीय उत्पन्नाच्या ३.२ टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले. ते गाठण्यासाठी सरकारला कसरत करावी लागेल, असे सध्याच्या आकडेवारीवरून दिसते.सरकारची मिळकत आणि खर्च याचे हे प्रमाण पुढील सहामाहीतही असेच राहिले तर वित्तीय तूट अंदाजापेक्षा दुप्पट होण्याचा धोका आहे. तथापि, जाणकारांच्या मते पुढील महिन्यात महसुलात वाढ होईल आणि तूट नियंत्रणात राहील.

टॅग्स :कर