Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI ची कारवाई; बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला ₹1,27,20,000 कोटींचा दंड, कारण काय..?

RBI ची कारवाई; बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला ₹1,27,20,000 कोटींचा दंड, कारण काय..?

जाणून घ्या दंडाचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 09:22 PM2024-08-16T21:22:32+5:302024-08-16T21:23:15+5:30

जाणून घ्या दंडाचे कारण...

Action by RBI; Bank of Maharashtra has been fined ₹1,27,20,000 crore, what is the reason..? | RBI ची कारवाई; बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला ₹1,27,20,000 कोटींचा दंड, कारण काय..?

RBI ची कारवाई; बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला ₹1,27,20,000 कोटींचा दंड, कारण काय..?

RBI Imposes Penalty On Bank Of Maharastra : देशातील बँकिंग क्षेत्राची नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) PSB (पब्लिक सेक्टर बँक) बँक ऑफ महाराष्ट्रला (Bank Of Maharastra) ला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पेनल्टी लोन सिस्टम ऑफर डिलिवरी ऑफ बँक क्रेडिट, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आणि KYC बाबत जारी केलेल्या नियमांचे बँकेने पालन न केल्यामुळे RBI ने हा दंड ठोठावला आहे. RBI ने बँकिंग नियमन अॅक्ट 1949 अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रला ₹ 1,27,20,000 चा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने सांगितले की, 31 मार्च 2023 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती तपासली गेली आणि मे 2023 पर्यंत बँकेच्या माहिती तंत्रज्ञानाचीही तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, बँकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले. यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस बजावून बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली. अखेर नियामकांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

Web Title: Action by RBI; Bank of Maharashtra has been fined ₹1,27,20,000 crore, what is the reason..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.