मुंबई - प्लॅस्टिकबंदीने निर्माण झालेली रोजगारांची समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून कृतीगट स्थापन केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रसायने मंत्रालयाचे सचिव पी. राघवेंद्र राव यांनी दिले.
यासंदर्भात आॅल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (एआयपीएमए) आयोजित केलेल्या चर्चासत्रात राव म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचे याकडे लक्ष आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. सरसकट प्लॅस्टिकबंदीऐवजी प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, बाजारस्थळी प्लॅस्टिक पुनर्निर्माणासाठी पार्क उभे करणे, अशा मागण्या असोसिएशनने केल्या. सरकारने लवकरच राष्टÑीय पेट्रोकेमिकल्स धोरण आखावे. त्यातून प्रक्रिया व छोट्या उद्योगांना फायदा होईल, असे मत असोसिएशनचे अध्यक्ष हितेन भेडा यांनी व्यक्त केले.
प्लॅस्टिक समस्येसाठी लवकरच कृतीगट
प्लॅस्टिकबंदीने निर्माण झालेली रोजगारांची समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून कृतीगट स्थापन केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रसायने मंत्रालयाचे सचिव पी. राघवेंद्र राव यांनी दिले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:40 AM2018-05-08T01:40:40+5:302018-05-08T01:40:40+5:30