Lokmat Money > बिझनेस न्यूज > थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

१२ बड्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यास सोमवारी येथे बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली.

By admin | Published: June 21, 2017 01:22 AM2017-06-21T01:22:03+5:302017-06-21T01:22:03+5:30

१२ बड्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यास सोमवारी येथे बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली.

Action plan to take action against the defaulters | थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १२ बड्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यास सोमवारी येथे बँक अधिकाऱ्यांची बैठक झाली. या थकबाकीदारांची नोंदणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे (एनसीएलटी) महिनाभरात करण्याबाबत बँकांना सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी कायद्यांतर्गत या १२ बड्या थकबाकीदार कंपन्यांची नावे गत आठवड्यात समोर आणली आहेत. यात एमटेक अ‍ॅटो, भूषण स्टील, एस्सार स्टील, भूषण पॉवर अँड स्टील, अलोक इंडस्ट्रिज, मोनेट इस्पात, लॅनको इन्फ्रा, इलेक्ट्रोस्टील, इरा इन्फ्रा, जिप्सी इन्फ्राटेक, एबीजी शिपयार्ड आणि ज्योती स्ट्रक्चर या कंपन्याचा थकबाकीदारात समावेश आहे.
या थकबाकीदारांवरील कारवाईची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती.

Web Title: Action plan to take action against the defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.