थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
अकोला: मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानाला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी केली.
अकोला: मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानाला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी केली.मालमत्ताधारक श्रीकृष्ण सुपे यांच्याकडे २००४-०५ व २०१४-१५ पर्यंतचा १२ हजार ९४६ रुपये मालमत्ता कर थकीत होता. कराचा भरणा करण्यासाठी सुपे यांना वारंवार नोटीस व सूचना दिल्यावरही कराचा भरणा न केल्याने दुकानाला सील लावण्याची कारवाई करण्यात आली.