Join us

भारतात फोक्सवॅगनवर कारवाई होणार

By admin | Published: October 04, 2015 10:42 PM

अन्य वाहनांच्या तुलनेत तब्बल ४० पट जास्त प्रदूषण करणाऱ्या फोक्सवगॅनच्या गाड्यांची तपासणी सुरू झाली असून आॅक्टोबर अखेरीपर्यंत या चाचणीचा अहवाल येणार असून त्यानंतर कंपनीच्या

मुंबई : अन्य वाहनांच्या तुलनेत तब्बल ४० पट जास्त प्रदूषण करणाऱ्या फोक्सवगॅनच्या गाड्यांची तपासणी सुरू झाली असून आॅक्टोबर अखेरीपर्यंत या चाचणीचा अहवाल येणार असून त्यानंतर कंपनीच्या भारतातील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. कंपनीचा पुण्यात प्रकल्प असून कंपनीने आतापर्यंत देशभरात एक लाख ८० हजारांच्या आसपास गाड्यांची विक्री केली आहे.फोक्सवॅगन कंपनीने केलेल्या घोटाळ््याची माहिती उघड झाल्यानंतर अमेरिकेने कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. यानंतर कंपनीने तातडीने अमेरिकेतील पाच लाख वाहने माघारी बोलावली. त्यापाठोपाठ युरोपातील काही देशांतूनही कंपनीच्या गाड्या माघारी बोलावण्यास सुरुवात झाली. ज्या वाहनांमध्ये हा गैरप्रकार केला आहे, ते इंजिन ‘ईए-१८९’ या बनावटीचे असून केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतासह अनेक देशांतून या इंजिनचा समावेश असलेल्या कंपनीच्या गाड्या आहेत.प्राथमिक अंदाजानुसार कंपनीच्या अशा वाहनांची संख्या ही एक कोटी १० लाख इतकी आहे. या सर्व गाड्या डिझेल इंजिनच्या आहेत. ‘ईए-१८९’ ही इंजिन प्रामुख्याने गोल्फ, पसाट, जेट्टा, बीटल तसेच आॅडीच्या काही मॉडेल्समध्ये आहे. २००९ ते २०१५ अशा कालावधीत यांची निर्मिती झाली आहे. ही सर्व मॉडेल्स भारतामध्ये देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील ग्राहकांची फसवणूक करतानाच प्रदूषणाची मात्रा वाढविण्यात कंपनीचा हातभार लागल्याचा कयास आहेवाहनातून होणाऱ्या कार्बन व नायट्रोजन आॅक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावटपद्धतीने सादर करणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीच्या भारतातील वाहनांची सखोल तपासणी करत या संदर्भातील अहवाल देण्याच आदेश केंद्र सरकारने नुकतेच ‘आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया’ (एआरएआय) या संस्थेला दिले आहेत. अमेरिका आणि युरोपातील देशांच्या तुलनेत भारतात वाहनातून होणाऱ्या उत्सर्जनाचे निकष वेगळे आहेत. येथील निकषांच्या आधारे कंपनीने भारतात किती प्रदूषण केले आहे, याचीही सखोल तपासणी होणार आहे. तपासणी नंतर कारवाईचा मार्ग खुला होईल. (प्रतिनिधी)