मुंबई : अमेरिका आणि युरोपातील उत्सर्जन मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आलेल्या फोक्सवॅगन कंपनीने भारतातील उत्सर्जन मर्यादेचेही उल्लंघन केले असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. या संदर्भात कंपनीकडे स्पष्टीकरण मागविण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर कंपनीवर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती गीते यांनी दिली. ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या आॅटोएक्स्पो प्रदर्शनाला त्यांनी गुरुवारी भेट दिली व त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
फोक्सॅवगन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माफीनामा सादर करतानाच भारतात आपण उत्सर्जनाच्या मर्यादा नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता. मात्र, कंपनाचा हा दावा फेटाळून लावत कंपनीने उत्सर्जन मर्यादेचे उल्लंघन केल्याची माहिती गीते यांनी दिली. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला असून ग्राहकांकडून गाड्याही मागे घेण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. कंपनीवर नेमकी कारवाई काय करणार, असे विचारले असता कंपनीच्या स्पष्टीकरणानंतरच कारवाई करून असे गीते यांनी स्पष्ट केले.
अमेरिका आणि युरोपात कंपनीने केलेला उत्सर्जन घोटाळा उजेडात आल्यानंतर भारतातही तपासणीची मागणी पुढे आली होती. यामध्ये इथेही कंपनीने या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने सुमारे तीन लाख गाड्या कंपनीने माघारी बोलावल्या व त्यांचे इंजिन बदलून देण्याची तयारी दर्शविली. यामध्ये २००८ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत कंपनीने भारतात विक्री केलेल्या वाहनांचा समावेश आहे.
१८ सप्टेंबर २०१६ रोजी कंपनीने केलेल्या बनावाची माहिती उघडकीस आल्यानंतर याचे पडसाद भारतातही उमटले.
कंपनीने ‘ईए-१८९’ हे इंजिन आपल्या विविध मॉडेल्समध्ये बसविले असून केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतासह अनेक देशांतून या इंजिनचा समावेश असलेल्या कंपनीच्या गाड्या आहेत. या इंजिनमुळे गाडीचा परफॉर्मन्स जरी वाढला असला तरी, प्रदूषणात वाढ झाली आणि मुख्य म्हणजे, कंपनीने सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रदूषणाची ही मात्रा दडविण्याचा प्रकार केला. (प्रतिनिधी)
फोक्सवॅगनवर कारवाई होणार
अमेरिका आणि युरोपातील उत्सर्जन मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे अडचणीत आलेल्या फोक्सवॅगन कंपनीने भारतातील उत्सर्जन मर्यादेचेही उल्लंघन केले असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते
By admin | Published: February 5, 2016 03:23 AM2016-02-05T03:23:34+5:302016-02-05T03:23:34+5:30