Lokmat Money > बिझनेस न्यूज > ९० व्या वर्षीही सक्रिय, ६० वर्षांपासून निरंतर काम; उभा केला ६९७०० कोटींचा व्यवसाय

९० व्या वर्षीही सक्रिय, ६० वर्षांपासून निरंतर काम; उभा केला ६९७०० कोटींचा व्यवसाय

ते आजही आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आठ आठ तास काम करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:32 AM2023-08-22T11:32:55+5:302023-08-22T11:33:34+5:30

ते आजही आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आठ आठ तास काम करत आहेत.

Active at age of 90 continuous work for 60 years Raised 69700 crore business success story prathap c reddy founder of apollo hospital group | ९० व्या वर्षीही सक्रिय, ६० वर्षांपासून निरंतर काम; उभा केला ६९७०० कोटींचा व्यवसाय

९० व्या वर्षीही सक्रिय, ६० वर्षांपासून निरंतर काम; उभा केला ६९७०० कोटींचा व्यवसाय

वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला काय करायला आवडेल असं विचारलं तर १०० पैकी ९९ लोकं आपण निवृत्त होऊन आनंदानं जीवन जगू असं म्हणतील. पण, अपोलो हॉस्पिटलचे संस्थापक प्रताप सी रेड्डी यांची कहाणी तरुणांसाठीच नाही, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरू शकते. कार्डियोलॉजिस्ट असलेल्या रेड्डी यांनी अमेरिकेतून परतल्यानंतर अपोलो रुग्णालयाचा पाया रचला. मोठं रुग्णालय उभारल्यानंतरही ते शांत बसले नाहीत. तर ते वयाच्या ९० व्या वर्षीही ऑफिसमध्ये जाऊन आठ तास काम करतात.

देशातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीशांपैकी एक असलेले प्रताप सी रेड्डी ९० वर्षांचे आहेत. या वयात आराम करण्याऐवजी आजही ते आठवड्याचे सहा दिवस काम करत असतात. आज त्यांच्या व्यवसायाचं बाजार भांडवल आज ६९,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

आठवड्याचे सहा दिवस काम
कार्डियोलॉजिस्ट असलेले प्रताप रेड्डी यांनी १९७० मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर १३ वर्षांनी म्हणजेच १९८३ मध्ये अपोलो हॉस्पिटल एन्टरप्रायझेसची सुरुवात केली. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुटुंबीयांची जवळपास २९ टक्के भागीदारी आहे. त्यांच नेटवर्थ १८००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ४० वर्षांच्या दीर्घकालिन सेवेनंतरही ते आज तितक्याच उत्साहानं काम करतात. आठवड्याचे सहा दिवस ते सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत असतात.

४ मुलींच्या हाती व्यवसायची सूत्रं
रेड्डी यांचा हेल्थकेअर व्हेन्चर त्यांच्या चार मुली प्रीता रेड्डी (एमडी), सुनिता रेड्डी (कार्यकारी उपाध्यक्ष), शोभना कामिनेनी (कार्यकारी उपाध्यक्ष) आणि संगीता रेड्डी (संयुक्त एमडी) सांभाळत आहेत.

आज देशभरात अपोलो समूहाची ७१ रुग्णालये, ५००० फार्मसी, २९१ प्रायमरी केअर क्लिनिक, डायग्नोस्टिक चेनच्या माध्यमातून सेवा देत आहेत. आपल्या या मोठ्या व्यवसायाला सांभाळण्यासाठी ते आपल्या पुढच्या पीढीलाही तयार करत आहेत. कदाचित याचमुळे वयाच्या ९० व्या वर्षीही ते रुग्णालयात जात आहेत. 

डॉ. प्रताप रेड्डी यांच्या १० नातवंडांपैकी ९ जण यापूर्वीच त्यांच्या व्यवसायात त्यांची साथ देत आहेत. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार डॉ. रेड्डी यांनी आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी आपल्या नातवडांमध्ये किती रस आहे याबद्दल विचारणाही केल्याचं सांगण्यात आलंय.

Web Title: Active at age of 90 continuous work for 60 years Raised 69700 crore business success story prathap c reddy founder of apollo hospital group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.