Join us

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप Chingari मध्ये अभिनेता सलमान खानची गुंतवणूक, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:05 PM

actor salman khan invests short video app chingari and become brand ambassador : चिंगारी हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मीडिया सुपर एन्टरटेन्मेंट अ‍ॅप आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) भारतातील शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप चिंगारीमध्ये (Chingari) गुंतवणूक केली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय मीडिया सुपर एन्टरटेन्मेंट अ‍ॅप असलेल्या चिंगारीने शुक्रवारी सलमान खानला जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार घोषित केले. मात्र, सलमान खानने चिंगारीमध्ये किती गुंतवणूक केली, हे कंपनीने सांगितले नाही. (actor salman khan invests short video app chingari and become brand ambassador)

चिंगारीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित घोष म्हणाले की, "चिंगारीसाठी ही अतिशय महत्त्वाची भागीदारी आहे. आमची भारतातील प्रत्येक राज्यात पोहोचण्याची इच्छा आहे. आमच्यासाठी आनंद आहे की सलमान खान आमच्या जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून आमच्यात सामील होत आहे. तसेच, आम्हाला विश्वास आहे की, आमची भागीदारी भविष्यात चिंगारी अधिक उंचावर आणण्यास मदत करेल."

याचबरोबर, या भागीदारीतून नवीन उंची गाठण्याचा आपला आत्मविश्वास असल्याचे सुमित घोष म्हणाले. दरम्यान, याबद्दल सलमान खान म्हणाला की, चिंगारीने आपले ग्राहक आणि सामग्री तयार करणार्‍यांना मूल्य जोडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण ते शहरी भागातील कोट्यवधी लोकांना आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी देण्याचे हे व्यासपीठ आहे.

या लोकांनी केलीय गुंतवणूकडिसेंबर 2020 पर्यंत चिंगारीने भारत आणि जगभरात आपल्या ब्लू चिप बॅकर्सपासून 1.4 मिलियन डॉलर्सचा फंड जमा केला होता. चिंगारीच्या गुंतवणूकदारांमध्ये एंजेल लिस्ट, आयसिड (iSeed), व्हिलेज ग्लोबल, ब्लूम फाउंडर्स फंड, जसमिंदरसिंग गुलाटी आणि इतर नामांकित गुंतवणूकदारांचा समावेश आहे. चिंगारीने अलीकडेच ऑनमोबाईलच्या नेतृत्वात 13 मिलियन डॉलर्सच्या नवीन राउंटला क्लोज केले आहे. या दरम्यान सहभागी होणार्‍या इतर गुंतवणूकदारांमध्ये रिपब्लिक लॅब यूएस, एस्टार्क व्हेन्चर्स, व्हाइट स्टार कॅपिटल, इंडिया टीव्ही (रजत शर्मा), जेपीआयएन वेंचर्स कॅटलिस्टर्स लिमिटेड, प्रिटबोर्ड वेंचर्स आणि काही मोठ्या फॅमिली ऑफिस फंड्सचा समावेश आहे.

चिंगारीबद्दल माहितीचिंगारी हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मीडिया सुपर एन्टरटेन्मेंट अ‍ॅप आहे. याची मालकी टेक 4 बिलियन मीडिया प्रायव्हेटकडे (Tech4Billion Media Private Limited) आहे.  या अ‍ॅपद्वारे युजर्स इंग्रजी आणि हिंदीसह 12 हून अधिक भाषांमध्ये व्हिडिओ तयार करू शकतात आणि अपलोड करू शकतात. आतापर्यंत चिंगारीने 56 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. भारतात चिंगारीचा युजर बेस प्रत्येक मिनिटाला वाढत आहे. 

टॅग्स :सलमान खानतंत्रज्ञानव्यवसाय