Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 02:00 PM2023-02-27T14:00:39+5:302023-02-27T14:01:10+5:30

शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे.

Adani 3 companies sink more than 75 percent will Hindenburg prediction come true | अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे. आकडेवारीनुसार हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रूपपैकी तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक घट पाहायला मिळाली आहे. तर एक कंपनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक बुडाली आहे आणि आणखी एका कंपनीचे शेअर्स ५० टक्क्यांहून अधिक पडले आहेत. अशा परिस्थितीत हिंडेनबर्गचे भाकीत खरे ठरताना दिसत आहे ज्यात अदानी समूहाचे शेअर्स ८० टक्क्यांपेक्षा जास्त ओव्हरव्हॅल्युड असल्याचे सांगण्यात आले होते. अदानी समूहाचे प्रवर्तक समूहाला वाचवण्यासाठी आणि शेअर्समध्ये तेजी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शेअर बाजार आणि अदानी समूहाच्या शेअर्सची काय स्थिती आहे हे जाणून घेऊयात...

अदानी समूहाचे शेअर्स घसरले

  • अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सुमारे ३ टक्क्यांच्या घसरणीसह १२७७ रुपयांवर व्यवहार करत आहे.
  • अदानी पोर्ट आणि एसईझेडचा शेअर १ टक्क्यांहून अधिक वाढीसह ५६५.५५ रुपयांवर व्यवहार करत आहे.
  • अदानी पावर तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह १४२ रुपयांवर व्यवहार करत आहे.
  • अदानी ट्रान्समिशनच्या स्टॉकमध्ये ५ टक्के लोअर सर्किट आहे आणि कंपनीचा स्टॉक ६७६.३५ रुपयांसह ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.
  • अदानी ग्रीन एनर्जीच्या स्टॉकमध्ये ५ टक्के लोअर सर्किट आहे आणि कंपनीचा स्टॉक ४६२.४५ रुपयांसह ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.
  • अदानी टोटल गॅसमध्ये ५ टक्के लोअर सर्किट आहे आणि कंपनीचा स्टॉक ७१५.९५ रुपयांसह ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.
  • अदानी विल्मारच्या शेअरमध्ये अडीच टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून कंपनीचा शेअर ३५२.९५ रुपयांवर व्यवहार करत आहे.
  • एसीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून कंपनीचा शेअर रु. १७१०.५० वर व्यवहार करत आहे.
  • अंबुजा सिमेंटच्या शेअरमध्ये सुमारे अडीच टक्क्यांची घसरण झाली असून कंपनीचा हिस्सा ३३६.७० रुपयांवर आहे.
  • NDTV च्या शेअरमध्ये ४ टक्क्यांची घसरण होत असून कंपनीचा शेअर १८३.१५ रुपयांवर व्यवहार करत आहे.


२४ जानेवारीपासून किती घट झाली?

  • अदानी टोटल गॅस- ८२ टक्के
  • अदानी ट्रान्समिशन- ७६ टक्के
  • अदानी ग्रीन एनर्जी- ७६ टक्के
  • अदानी एंटरप्रायझेस- ६३ टक्के
  • अदानी पावर- ४९ टक्के
  • अदानी विल्मर- ३९ टक्के
  • एनडीटीव्ही- ३५ टक्के
  • अंबुजा सीमेंट- ३२ टक्के
  • अदानी पोर्ट आणि SEZ- २७ टक्के
  • एसीसी लिमीटेड- २७ टक्के


शेअर बाजाराची सद्यस्थिती
शेअर बाजारातही घसरण आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३६१.०३ अंकांच्या घसरणीसह ५९,१०२.९० अंकांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी १३६ अंकांच्या घसरणीसह १७,३२७.७० अंकांवर व्यवहार करत आहे. विदेशी बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण होताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही तुटला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातही स्पष्ट दिसत आहे.    

Web Title: Adani 3 companies sink more than 75 percent will Hindenburg prediction come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.