Join us

शेअर बाजाराच्या घसरणीचा अदानी, अंबानी, जिंदाल यांना मोठा फटका, झालं अब्जावधींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 1:21 PM

देशांतर्गत शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे मंगळवारी जगभरातील अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नुकसान अदानी आणि अंबानींना सहन करावं लागलं.

देशांतर्गत शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे मंगळवारी जगभरातील अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नुकसान अदानी आणि अंबानींना सहन करावं लागलं. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत ३.३८ अब्ज डॉलरची घट झाली आहे, तर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २.२४ अब्ज डॉलरची घट झाली आहे. याशिवाय भारतीय अब्जाधीश सावित्री जिंदाल, केपी सिंग, मंगल प्रभात लोढा, शिव नाडर, कुमार मंगलम बिर्ला, राहुल भाटिया आणि नुस्ली वाडिया यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली.मंगळवारचा दिवस केवळ भारतीय शेअर बाजारासाठीच नाही तर अदानी समूहाच्या शेअर्ससाठी अशुभ ठरला. अदानी पॉवर ३.२७ टक्क्यांनी तर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स २.९७ टक्क्यांनी घसरले. अदानी टोटल गॅस ५ टक्क्यांनी घसरून ९९६ रुपयांवर आला. अदानी पोर्टही ४.२७ टक्क्यांनी घसरला. अदानी ग्रीन आणि अदानी विल्मर यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. अदानी एनर्जी सोल्यूशनमध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीमध्येही मोठी घसरण झाली.श्रीमंतांच्या यादीतही घसरणअदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही झाला. त्यांना एका दिवसात ३.३८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. यासह, ते आता ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यांदीत १४ व्या स्थानावर घसरले आहेत. आता त्यांची एकूण संपत्ती ९०.१० अब्ज डॉलर्स झाली. तर अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी एका स्थानानं घसरून १२ व्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची संपत्ती आता ९९.१० अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे. मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सही २ टक्क्यांहून अधिक घसरले.यांच्या संपत्तीतही घटमंगळवारी, जिंदाल समूहाच्या सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत १.८४ अब्ज डॉलर्सची घट झाली. डीएलएफचे केपी सिंगला यांना  ८५१ मिलियनचा झटका बसला. तर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर यांची संपत्ती ४४० मिलियन डॉलर्सनं घसरून ३५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी ४९० मिलयन तर कुमार बिर्ला यांनी ४१९ मिलियन डॉलर्स गमावले.

टॅग्स :गौतम अदानीमुकेश अंबानी