Adani-Ambani Networth : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात(Share Market) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला आहे. सेन्सेक्सने 75500 चा आकडा पार केला आहे, तर निफ्टीने 23004 अंकांच्या विक्रमाला स्पर्श केला आहे. या तेजीचा फायदा देशातील अनेक उद्योगपतींना होत आहे. गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये बंपर वाढ नोंदवली गेली, ज्याचा थेट परिणाम गौतम अदानी यांच्या नेटवर्थवर झाला आहे.
गौतम अदानी अंबानींच्या जवळ पोहोचले...ब्लूमबर्गच्या(Bloomberg Billionaires Index) आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात अदानींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली. या यादीत गौतम अदानी सध्या 13व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अलीकडेच पुन्हा एकदा $100 अब्ज क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती $109B आहे. म्हणजे एका आठवड्यात अदानींची संपत्ती $9 अब्जने वाढली आहे. विशेष म्हणजे, आता त्यांच्या पुढे रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. सध्या मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $114 अब्ज आहे. म्हणजेच, अदानी फक्त 5 अब्ज डॉलर्सने मागे आहेत.
बर्नार्ड अर्नॉल्ट अव्वल स्थानावर ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट $211 अब्ज संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. तर, जेफ बेझोस दुसऱ्या, टेस्ला प्रमुख इलॉन मस्क तिसऱ्या, मार्क झुकरबर्ग चौथ्या, लॅरी पेज पाचव्या आणि बिल गेट्स सहाव्या स्थानावर आहेत.