नवी दिल्ली :
भारतातील दाेन सर्वात श्रीमंत उद्याेजक अदानी समुहाचे अध्यक्ष गाैतम अदानी आणि रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आमने-सामने आले आहेत. कर्जात बुडालेल्या फ्युचर रिटेलच्या खरेदीसाठी दाेन्ही उद्याेजक शर्यतीत आहेत. दाेन्ही समुहांनी फ्युचर रिटेलसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, अदानी एअरपाेर्ट हाेल्डिंग्स आणि फ्लेमिंगाे ग्रुपच्या एका जाॅईंट व्हेंचरने फ्युचर रिटेलसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहे. तर रिलायन्स रिटेल व्हेंचर्सदेखील या प्रक्रियेत सहभागी झाली आहे. एकूण १३ कंपन्यांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहेत.
बिग बाजार नावाने हाेते स्टाेर्सफ्युचर समुहाची फ्लॅगशिप रिटेल युनिट फ्युचर रिटेलसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची मुदत नाेव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी संपली हाेती. ‘बिग बाजार’ या नावाने समुहाचे स्टाेर्स देशभरात सुरू हाेते. २८,००० काेटी रुपयांचे कंपनीवर कर्ज आहे. दिवाळखाेरीप्रकरणी कंपनीला ३३ वित्त संस्थांचे कर्ज फेडायचे आहे. त्यात बॅंक ऑफ इंडिया आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाचाही समावेश आहे.
२००७ फ्युचर रिटेलची स्थापना, २८,८२१ काेटी रुपये कंपनीवर कर्जकंपनीकडील मालमत्ता ३० माेठे स्टाेर्स, ३०० लहान आउटलेट (लीजवर), २० रिटेल स्टाेर्स गहाण ठेवलेनागपुरातील पूर्णपणे ऑटाेमेटेड सप्लाय चेन साेल्यूशन फॅसिलिटीहळूहळू कर्जात बुडाली कंपनीकिशाेर बियानी यांनी स्थापन केलेली फ्युचर रिटेल्स ही देशातील दुसरी सर्वात माेठी रिटेल कंपनी हाेती. या कंपनीवरील कर्जात हळूहळू वाढ हाेत २८,००० काेटी रुपयांवर गेली. ते फेडता न आल्यामुळे कंपनी दिवाळखाेरीत गेली आहे.
रिलायन्ससाेबत यापूर्वी झाला हाेता साैदाफ्युचर रिटेल्सने यापूर्वी रिलायन्स समुहासाेबत २४ हजार काेटी रुपयांची डील केली हाेती. मात्र, ‘ॲमेझाॅन’साेबत केलेल्या करारामुळे हा व्यवहार कायदेशीर अडचणींमुळे पूर्ण हाेऊ शकला नाही. ॲमेझाॅनने आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनलमध्ये व त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी खटला जिंकला हाेता.
या कंपन्यांचाही सहभागशालीमार काॅर्पाेरेशन, नलवा स्टील ॲण्ड पाॅवर, युनायटेड बायाेटेक, डब्ल्यूएच स्मिथ ट्रॅव्हल, कॅपरी ग्लाेबल हाेल्डिंग्स इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.