Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी, ब्रिटानिया, पारलेला मागे टाकलं; ITC बनली देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी, जाणून घ्या

अदानी, ब्रिटानिया, पारलेला मागे टाकलं; ITC बनली देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी, जाणून घ्या

आयटीसीनं आपल्या स्पर्धक कंपन्यांना मागे टाकलंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:12 PM2023-12-08T12:12:57+5:302023-12-08T12:16:24+5:30

आयटीसीनं आपल्या स्पर्धक कंपन्यांना मागे टाकलंय...

Adani Britannia Parle product gone behind ITC becomes country s largest FMGC company know | अदानी, ब्रिटानिया, पारलेला मागे टाकलं; ITC बनली देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी, जाणून घ्या

अदानी, ब्रिटानिया, पारलेला मागे टाकलं; ITC बनली देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी, जाणून घ्या

सिगारेटपासून साबणापर्यंत वस्तू तयार करणारी कंपनी आयटीसीनं अदानी विल्मर, ब्रिटानिया, पारले प्रोडक्ट्स आणि अन्य स्पर्धक कंपन्यांना मागे टाकलंय. आयटीसीनं या कंपन्यांना मागे टाकत सर्वात मोठी फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमजीसी) कंपनी बनली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आयटीसी लिमिटेडनं सप्टेंबरपर्यंत नऊ महिन्यांच्या देशांतर्गत विक्रीच्या आधारे हा पल्ला गाठलाय. मार्केट ट्रॅकर नील्सन आयक्यूच्या अधिकऱ्यांनी ही माहिती दिलीये.

नील्सनआयक्यू डेटानुसार आयटीसीनं या कालावधीत फूड एफएमजीसीची विक्री १७१०० कोटी रुपये झाली. तर ब्रिटानियाची विक्री १६७०० कोटी रुपये, अदानी विल्मरची विक्री १५९०० कोटी रुपये, पारले प्रोडक्ट्सची विक्री १४८०० कोटी रुपये झाली. याशिवाय मोंजेलेजनं १३८०० कोटी, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडनं १२२०० कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री केली. दरम्यान, यावेळी आयटीसीच्या आशीर्वाद ब्रँड पॅकेज्ड पीठाचा त्यांच्या एफएमजीसी रेव्हेन्यूमध्ये मोठा वाटा आहे.

गेल्या वर्षी अदानी विल्मरचं वर्चस्व
गेल्या वर्षी याच कालावधीत अदानी विल्मरचं बाजारात वर्चस्व होतं. यावेळी आयटीसीनं ४ स्थानांची उडी घेतली आहे. नील्सनआयक्यूच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत अदानी विल्मरची विक्री १६१०० कोटी रुपये होती. तर ब्रिटानियाची विक्री १४९०० कोटी, पारले १४८०० कोटी, आयटीसी १३९०० कोटी आणि मोंडलेजची विक्री १२४०० कोटी रुपये होती.

Web Title: Adani Britannia Parle product gone behind ITC becomes country s largest FMGC company know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.