Join us

अदानी प्रकरणाचा बँकांवर परिणाम नाही - रिझर्व्ह बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 10:37 AM

विदेशातील प्रवाशांना यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा

मुंबई : अदानी समूह प्रकरणाचा देशातील बँकांवर कोणताही परिणाम होणार नाही. देशातील बँका इतक्या मोठ्या आणि भक्कम आहेत की, अशा प्रकरणांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे.हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन आर्थिक संशोधन आणि गुंतवणूक कंपनीचा अहवाल पाहता बँकांनी अदानी समूहाच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाबाबत विविध स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या अहवालानंतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

आता एटीएममधून नाणी बाहेर येणारआता तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून एटीएममधून नाणी काढू शकाल. आरबीआयने बुधवारी पतधोरणाच्या बैठकीनंतर नाण्यांसाठी व्हेंडिंग मशिन्स उभारण्याची घोषणा केली. दास यांनी सांगितले की त्यांची क्यूआर कोडवर आधारित कॉईन वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आहे. रिझर्व्ह बँककडून सुरुवातीच्या टप्प्यात देशातील १२ शहरांमध्ये याची सुरुवात करण्यात येईल. क्यूआर कोड आधारित व्हेंडिंग मशीनचा वापर यूपीआयद्वारे केला जाईल आणि नोटांऐवजी नाणी बाहेर येतील.

महागाई छळत राहणारआरबीआयने पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये किरकोळ महागाईचा दर कमी होत ५.३ टक्क्यांवर येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र किरकोळ महागाई ६.५ टक्क्यांच्या पातळीवर राहणार असल्याने सामान्यांना महागाईच्या झळा बसत राहणार आहेत. महागाईचा दबाव कायम असल्याचे दास म्हणाले.

घर खरेदीदारांना फटकारेपो दरात पुन्हा एकदा वाढ केल्याने गृहकर्जाचा व्याजदर वाढणार आहे. त्यामुळे परवडणाऱ्या आणि कमी-मध्यम-उत्पन्न  श्रेणीतील घरांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. व्याजदरात सतत वाढ होत राहिल्याने लोकांची आणि कंपन्यांची कर्ज घेण्याची मानसिकता कमी होत जाईल.- हर्षवर्धन पटोदिया, अध्यक्ष, क्रेडाई

आरबीआयने काय म्हटले? - रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करून तो ६.५० टक्के.- चालू आर्थिक वर्षात विकास दर ७% राहण्याचा अंदाज आहे. २०२३-२४ मध्ये विकास दर ६.४ टक्क्यांपर्यंत खाली येईल.- इतर आशियाई चलनांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात आणि या वर्षी आतापर्यंत रुपयामध्ये कमी अस्थिरता.- चालू खात्यातील तूट २०२२-२३च्या दुसऱ्या सहामाहीत कमी होईल.- दुकानांमध्ये पेमेंट करण्यासाठी भारतात येणाऱ्या प्रवाशांना यूपीआयची सुविधा मिळणार

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकगौतम अदानीव्यवसायबँक