Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani group: अदानी समुह घोटाळा आरोप प्रकरणी मोठी अपडेट! SEBI ने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

Adani group: अदानी समुह घोटाळा आरोप प्रकरणी मोठी अपडेट! SEBI ने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:48 PM2023-02-14T18:48:39+5:302023-02-14T18:52:42+5:30

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

adani case sebi told the supreme court it has a strong framework to deal with market volatility | Adani group: अदानी समुह घोटाळा आरोप प्रकरणी मोठी अपडेट! SEBI ने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

Adani group: अदानी समुह घोटाळा आरोप प्रकरणी मोठी अपडेट! SEBI ने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. आता या संदर्भात सेबी चौकशी करत आहे.  दरम्यान, सेबीने सुप्रीम कोर्टात या संदर्भात माहिती दिली आहे. 'हिंडेनबर्गचा अहवाल जाहीर होण्यापूर्वी आणि नंतर शेअर बाजारातील रिपोर्ट तपासला जाईल आणि अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरुद्ध केलेल्या आरोपांसह नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले आहे का याची  तपासणी केली जाईल, अशी माहिती सेबीने कोर्टात दिली आहे. 

'शेअर मार्केट सुरळीत करण्यासाठी आणि शेअर बाजारातील अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी  मजबूत फ्रेमवर्क आहे, असं सेबीने म्हटले आहे.  अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर दाखल झालेल्या दोन जनहित याचिकांवर सोमवारी सुनावणी झाली.यावेळी  सेबीच्या नियमांचे, शॉर्ट सेलिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का? "अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी आणि लगेचच हिंडेनबर्गचे आरोप आणि शेअर मार्केटमधील प्रक्रिया या दोन्हींची तपासणी करत असल्याची माहिती सेबीने कोर्टात दिली.

एवढे महाग गिफ्ट! व्हॅलेंटाईन 'डे' दिवशी पत्नीला दिले रतन टाटांच्या घरापेक्षाही महाग गिफ्ट

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा शेअर बाजारावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सेबीने म्हटले आहे. “भारतीय शेअर मार्केटने याआधीही वाईट अस्थिरता पाहिली आहे, कोरोना महामारीच्या काळात, जेव्हा 2 मार्च 2020 ते 19 मार्च 2020 दरम्यान निफ्टी सुमारे 26 टक्क्यांनी घसरला होता. बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, सेबीने 20 मार्च 2020 रोजी आपल्या विद्यमान बाजार यंत्रणेमध्ये काही बदल केले होते, असंही सेबीने म्हटले आहे. 

अदानींनी सादर केले निकाल, शेअर बाजाराची मोठी झेप

आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises Q3 Results) तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बाजारात तेजी आली आणि ही वाढ शेवटपर्यंत कायम राहिली.

व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी उसळी घेऊन 61,032.26 च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 159 अंकांच्या वाढीसह 17,929.85 च्या पातळीवर बंद झाला.

तत्पूर्वी, जागतिक बाजारातील वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजारही जोरदार उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 60,600 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला.तर दुसरीकडे निफ्टीही 4 अंकांची किंचित वाढ घेत 17,800 च्या पातळीवर उघडला. शेअर बाजारातील या मजबूत तेजीमागे गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे तिसऱ्या तिमाहीचे निकालही मानले जाऊ शकतात.

Web Title: adani case sebi told the supreme court it has a strong framework to deal with market volatility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.