Lokmat Money > बिझनेस न्यूज > २५० टक्के डिव्हिडंट देतेय अदानींची 'ही' कंपनी, 'या' आठवड्यात एक्स डेट; ₹७३५ च्या पुढे शेअर

२५० टक्के डिव्हिडंट देतेय अदानींची 'ही' कंपनी, 'या' आठवड्यात एक्स डेट; ₹७३५ च्या पुढे शेअर

कंपनीचे शेअर्स २८ जुलै २०२३ रोजी २५० टक्के डिव्हिडंटसाठी एक्स डेटमध्ये ट्रेड करतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:45 PM2023-07-24T14:45:14+5:302023-07-24T14:45:47+5:30

कंपनीचे शेअर्स २८ जुलै २०२३ रोजी २५० टक्के डिव्हिडंटसाठी एक्स डेटमध्ये ट्रेड करतील.

Adani company paying 250 percent dividend, ex date this week; A share at ₹735 onwards | २५० टक्के डिव्हिडंट देतेय अदानींची 'ही' कंपनी, 'या' आठवड्यात एक्स डेट; ₹७३५ च्या पुढे शेअर

२५० टक्के डिव्हिडंट देतेय अदानींची 'ही' कंपनी, 'या' आठवड्यात एक्स डेट; ₹७३५ च्या पुढे शेअर

Adani stock dividend: देशातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर अदानी पोर्ट्स अँड स्पेशन इकॉनॉमिक झोनच्या (APSEZ) शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा लक्ष आहे. या आठवड्यात कंपनीच्या शेअर्सची एक्स डिव्हिडेंट तारीख निश्चित करण्यात आलीये. अदानी पोर्ट्सचे शेअर्स २८ जुलै २०२३ रोजी २५० टक्के डिव्हिडंटसाठी एक्स डेटमध्ये ट्रेड करतील.

३१ मार्च २०२३ च्या चौथ्या तिमाही आणि वर्षाच्या अखेरच्या निकालांची घोषणा करताना अदानी पोर्ट्सच्या संचालक मंडळानं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी २ रुपये प्रति इक्विटी शेअरवर ५ रुपयांच्या डिव्हिडंटची शिफारस केली होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये डेव्हिडंट पेमेंट व्हॅल्यू १०८० कोटी रूपये आहे. हे डिव्हिडंट कंपनीच्या शेअरधारकांच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधआरण सभेतील मंजुरीअंतर्गत आहे. ही सबा ८ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केली जाणार आहे.

शेअर्सची स्थिती
कंपनीचे शेअर सोमवारी दुपारी कामकाजादरम्यान ७३९ रुपयांवर ट्रेड करत होते. यावर्षी YTD मध्ये शेअर्स जवळपास १०.५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत. गेल्या वर्षभरात यात १.९८ टक्के आणि पाच वर्षांत हा शेअर ८६.२७ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९८७.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३९४.९५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,५८९८५३.०२ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani company paying 250 percent dividend, ex date this week; A share at ₹735 onwards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.