Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी इज बॅक! दर सेकंदाला कमावले जवळपास २ कोटी रुपये, दिग्गजांना टाकलं मागे

अदानी इज बॅक! दर सेकंदाला कमावले जवळपास २ कोटी रुपये, दिग्गजांना टाकलं मागे

गौतम अदानी यांच्या संपत्तीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. ही वाढ चार दिवसांतील सर्वाधिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 06:55 PM2023-03-03T18:55:06+5:302023-03-03T18:56:09+5:30

गौतम अदानी यांच्या संपत्तीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. ही वाढ चार दिवसांतील सर्वाधिक आहे.

adani earns around rs 2 crore every second beats veterans in terms of earning | अदानी इज बॅक! दर सेकंदाला कमावले जवळपास २ कोटी रुपये, दिग्गजांना टाकलं मागे

अदानी इज बॅक! दर सेकंदाला कमावले जवळपास २ कोटी रुपये, दिग्गजांना टाकलं मागे

गौतम अदानी यांच्या संपत्तीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. ही वाढ चार दिवसांतील सर्वाधिक आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी हे शुक्रवारी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त नफा मिळवणारे होते. आज गौतम अदानींनी प्रत्येक सेकंदाला सुमारे दोन कोटी रुपये कमावले आहेत. 

अदानींच्या शेअर्सच्या वाढीमुळे अदानींच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या मते, त्याच्या संपत्तीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अदानी यांच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. आज त्यांच्या एकूण संपत्तीत ५.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४४ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ४३.३ अब्ज डॉलर झाली आहे. आता ते जगातील २६ वे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनला आहे. आज त्यांच्या संपत्तीत १४.३९ टक्के वाढ झाली आहे. आज फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत गौतम अदानींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

दर सेकंदाला 2 कोटी रुपये कमाई
स्टॉक मार्केट बंद होईपर्यंत गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्ये ४,४२,६८,१२,००,००० रुपयांची वाढ झाली आहे. जर एका मिनिटात कमाईची विभागणी केली तर ही रक्कम १,१८,०४,८३,२०० रुपयांपर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे एका सेकंदात १,९६,७४,७२० रुपयांची वाढ दिसून आली आहे.

Web Title: adani earns around rs 2 crore every second beats veterans in terms of earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.