नवी दिल्ली : गौतम अदानी आणि त्यांच्या ग्रुपसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील 70 वीज कंपन्यांना मागे टाकत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (अदानी इलेक्ट्रिसिटी) वीज वितरणात नंबर 1 कंपनी बनली आहे. कंपनीचा उत्तम कारभार, आर्थिक स्थिरता, बाह्य वातावरण यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीला हा सन्मान मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील वीज वितरण युटिलिटीच्या उर्जा मंत्रालयाच्या 'एन्युअल इंटिग्रेटिड रेटिंग आणि रँकिंग' च्या 11 व्या आवृत्तीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीने A+ ग्रेडसह पहिला रँक मिळवला आणि 100 पैकी 99.6 हा टॉप इंटिग्रेटिड स्कोअर मिळवला. अदानी इलेक्ट्रिसिटीने कामगिरी उत्कृष्टतेसाठी 13 पैकी 12.8 स्कोअर मिळवले, ज्यामध्ये बिलिंग कार्यक्षमता, कमी वितरण हानी, संकलन कार्यक्षमता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांचा समावेश आहे. इतर सर्व पॅरामीटर्समध्ये कंपनीने 12 पैकी 11.9 स्कोअर मिळवले आहेत. तसेच, कंपनीला आर्थिक स्थिरतेचे 75 स्कोअर मिळाले आहेत.
'या' कारणांमुळे मिळाले चांगले स्कोअर
- डिजिटाइज्ड बिल जनरेशन आणि पेमेंट : ग्राहकांसाठी पेमेंट सुलभ करण्यासाठी UPI आणि पेमेंट गेटवेसोबत पार्टनरशिप केली आहे.
- अॅडव्हान्स मीटर रीडिंग टेक्नॉलॉजीच्या अंमलबजावणीमुळे बिलिंग त्रुटी कमी झाल्या आहेत.
- एनॅलिटिक्स आणि मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टिमच्या वापरामुळे वीजचोरी रोखण्यात मदत झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत वितरण तोटा 9.1 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांवर आला आहे.
सर्वात कमी दरवाढीची घोषणा
मॅकिन्से अँड कंपनीने अलीकडेच प्रकाशित केलेल्या रेटिंग रिपोर्टमध्ये 2019-2020 ते 2022-2023 या तीन आर्थिक वर्षांतील वीज वितरण युटिलिटीचे मूल्यांकन केले आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (अदानी इलेक्ट्रिसिटी) ने अलीकडेच बहु-वर्षीय शुल्क यंत्रणेच्या अंतर्गत पुनरावलोकन केलेल्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व डिस्कॉम्समध्ये सर्वात कमी दरवाढीची घोषणा केली होती.
इतक्या कंपन्याचे होते मूल्यमापन
एन्युअल इंटिग्रेटिड रेटिंग आणि रँकिंग पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे आयोजित केले जाते, जे 2012 मध्ये ऊर्जा मंत्रालयाने मंजूर केलेल्या फ्रेमवर्कचे पालन करून नोडल एजन्सी म्हणून काम करते. या मूल्यमापनात एकूण 71 वीज वितरण युटिलिटिजचा समावेश आहे. ज्यामध्ये 45 राज्य वितरण कंपन्या, 14 खाजगी डिस्कॉम आणि संपूर्ण भारतातील 12 वीज विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे.