Join us

Adani Electricity : मुंबईकरांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची नवी सेवा, Video Calling द्वारे सोडवता येणार बिलाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 6:32 PM

कंपनीनं लाँच केले स्मार्ट मीटर्स.

Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीनं आपल्या ग्राहकांसाठी चार नव्या डिजिटल सेवांची सुरूवात केली आहे. तुम्ही घरी असाल किंवा बाहेर कोणत्याही ठिकाणी असाल तुम्हाला मोबाईलद्वारे अदानी इलेक्ट्रिसिटी कडून देण्यात येत असलेल्या या सुविधांचा लाभ घेता येईल. दरम्यान, कंपनी आपल्या ग्राहकांना व्हिडीओ कॉलिंगद्वारे बिलाची तक्रार सोडवण्याची सुविधाही पुरवणार आहे.

“पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) नुकत्याच जाहीर केलेल्या देशातील वीज वितरण कंपन्यांच्या क्रमवारीत अदानी इलेक्ट्रिसिटीला मुंबईची प्रथम क्रमांकाची सेवा म्हणून स्थान दिले आहे. ते आमच्या 'पॉवर ऑफ सर्व्हिस' या धारणेवरील विश्वासाचेच फलित आहे असा आमचा विश्वास आहे. या नवीन सेवांद्वारे, आम्हाला खात्री आहे की आम्ही सर्वात पसंतीची वीज वितरण सेवा म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत करू,” अशी प्रतिक्रिया अदानी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांनी या सेवांच्या अनावरणादरम्यान दिली.

ही-असिस्ट हे व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट सेंटर सुरू

अदानी इलेक्ट्रिसिटीने व्ही-असिस्ट हे व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट सेंटर सुरू केले आहे जेथे ग्राहक व्हिडिओवर कस्टमर केअर अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतात. अशा प्रकारची अभिनव सेवा सुरू करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी ही जगातील वीज वितरण क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. सध्या प्रचलित व्यक्तीनिरपेक्ष स्वरूपाच्या हेल्पलाईन वापरणाऱ्या ग्राहकांच्या अनुभतीपेक्षा, खूप वेगळ्या प्रकारची ही सेवा आहे. ग्राहकांना रोख आणि धनादेशाद्वारे देयक भरणा करण्याचा पर्याय, रोख बदल स्वीकारण्याचा पर्याय, देयकाच्या काही भागाचा भरणा करण्याचा पर्याय, देयकाची प्रत डाउनलोड करणे, तक्रारी नोंदवणे आणि व्हिडीओ कॉल्समध्ये संपर्क साधणे यासारख्या विशेष क्षमतांसह प्रगत स्व-मदत (सेल्फ हेल्प) किऑस्क देखील सुरू केले गेले आहेत. वीज वितरण कंपनीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी सोयीस्करपणे असे ७० सेल्फ हेल्प किऑस्क यंत्र बसवले आहेत.

चॅटबॉटही सादरअदानी इलेक्ट्रिसिटीचे चॅटबॉट ‘इलेक्ट्रा’ आता उत्कृष्ट क्षमतेसह सादर केले गेले आहे आणि ग्राहकांना चांगल्या अनुभवासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि एआय यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश त्यात करण्यात आला आहे. परिणामी ‘इलेक्ट्रा’ लवकरच ग्राहकांशी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये संवाद साधेल. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या संकेतस्थळ, अॅप आणि व्हॉट्सअॅपद्वारे ‘इलेक्ट्रा’शी संपर्क साधता येणार आहे.

स्मार्ट मीटर्सही लाँचनवीन डिजिटल सुविधांच्या प्रस्तुतीचा एक भाग म्हणून, अदानी इलेक्ट्रिसिटी स्मार्ट मीटर्स देखील लाँच करत आहे, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराच्या पद्धतींचे अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. यामध्ये तुम्हाला रिअल टाईम मीटर रिडिंग, प्रीपेड-पोस्टपेड मीटरींग सुविधा सुरू करणे, सोलर ग्राहकांसाठी नेट मीटरिंग सुविधा, आणि 'रिमोट डिस्कनेक्शन/कनेक्शनसाठी विनंती यांचा वापरही करता येणार आहे.

टॅग्स :अदानीवीज