Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani समुहाच्या ६ कंपन्यांमध्ये तेजीनं वाढला विदेशी पैसा, सेबीच्या तापासात समोर आला हा ट्रेंड

Adani समुहाच्या ६ कंपन्यांमध्ये तेजीनं वाढला विदेशी पैसा, सेबीच्या तापासात समोर आला हा ट्रेंड

सप्टेंबर २०२२ पासून, अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या FPIs मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बाजार नियामकाला आढळलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:36 PM2023-06-15T15:36:15+5:302023-06-15T15:38:45+5:30

सप्टेंबर २०२२ पासून, अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या FPIs मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बाजार नियामकाला आढळलं आहे.

adani-enterprises-adani-total-gas-adani-transmission-among-6-adani-group-stocks-who-attracted-fpi-hugely-sebi-investigating-know-details | Adani समुहाच्या ६ कंपन्यांमध्ये तेजीनं वाढला विदेशी पैसा, सेबीच्या तापासात समोर आला हा ट्रेंड

Adani समुहाच्या ६ कंपन्यांमध्ये तेजीनं वाढला विदेशी पैसा, सेबीच्या तापासात समोर आला हा ट्रेंड

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर बाजार नियामक सेबी अदानी समूहाच्या कंपन्यांवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, अदानी समुहाच्या सहा सूचीबद्ध कंपन्यांमध्ये 2020 च्या सप्टेंबर तिमाहीपासून विदेशी गुंतवणूक वाढल्याचं निरिक्षण सेबीनं नोंदवलंय. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने ही माहिती दिली आहे. FPI म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार असतात.

अदानी समूहाच्या 6 कंपन्यांमधील तिमाही विदेशी शेअरहोल्डिंग ट्रेंडचे विश्लेषण 2020 च्या सप्टेंबर तिमाहीपासून FPI च्या संख्येत वाढ दर्शवत असल्याचं समोर आलंय. अदानी समूहाच्या या 6 कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी पोर्ट्स आणि अदानी पॉवर यांचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

कोणत्या कंपन्यांत किती वाढ?
सेबीला असे आढळून आलंय की अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एफपीआयची संख्या सप्टेंबर 2020 मध्ये 133 वरून तिपटीनं वाढून मार्च 2023 मध्ये 410 झाली आहे. अदानी टोटल गॅसमधील विदेशी गुंतवणूकदारांची संख्या ६३ वरून ५३२ वर पोहोचली आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये एफपीआयची संख्या ६२ वरून ४३१ आणि अदानी ग्रीनमध्ये ९४ वरून ५८१ झाल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, कंपन्यांचं समूहानं नंतर अधिग्रहण केलं असल्यानं एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्हीचे होल्डिंग्स विचारात घेण्यात आले नाहीत. 

या आरोपांचा तपास
बाजार नियामक सेबी अदानी समूहाच्या कंपन्यांमधील विदेशी गुंतवणूकदारांच्या हिस्स्याचा आणि किमान शेअरहोल्डिंग नियमांचे कथितरित्या उल्लंघन केल्याच्या आरोपांचा तपास करत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने या वर्षी जानेवारीत प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा विषय मांडण्यात आला होता. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. अदानी समुहानं त्यांच्यावर करण्यात आलेला आरोपांचं खंडन केलं होतं.

Web Title: adani-enterprises-adani-total-gas-adani-transmission-among-6-adani-group-stocks-who-attracted-fpi-hugely-sebi-investigating-know-details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी