नवी दिल्ली: भारतासह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे उद्योगांची अवस्था बिकट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक क्षेत्रातील लघु, मध्यम तसेच मोठे उद्योग तोट्यात गेले आहेत. हजारो कंपन्यांना टाळे लागले आहे. मात्र, काही बड्या उद्योगांनी या संकटाचे संधीत रुपांतर केल्याचे पाहायला मिळत आहे. अदानी ग्रुप (adani enterprises) हा अशाच उद्योग समूहांपैकी असून, गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांना भरघोस फायदा झाल्याचे दिसत आहे. अशातच आता अदानी ग्रुप देशात पुन्हा मोठी गुंतवणूक करत आहे. यातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील, असे सांगितले जात आहे. (adani enterprises allotted industrial land with 12 companies at noida will generate 48 thousand jobs)
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा प्राधिकरणाने अदानी ग्रुपच्या अदानी एन्टरप्राइझेस आणि डिक्सन टेक्नॉलॉजीसह १३ कंपन्यांना नोयडा विभागात औद्योगिक जमीन दिली आहे. नोएडा येथील सेक्टर ८० मध्ये ३९ हजार १४६ चौरस मीटर जमीन अदानी एंटरप्राइझेसला देण्यात आली आहे. यामध्ये कंपनीकडून २ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे, असे नोएडा प्राधिकरणाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
LIC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! २० टक्के पगारवाढ होणार; केंद्राचा लवकरच निर्णय
अदानीकडून डेटा सेंटरची स्थापना
नोएडा प्राधिकरणाने दिलेल्या या जमिनीवर अदानी एन्टरप्राइझेस डेटा सेंटरची स्थापना करणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्राधिकरणाने ४ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या औद्योगिक भूखंडांच्या वाटपासाठी प्रस्ताव मागवले होते. फेब्रुवारीमध्ये अर्जप्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या आणि बुधवारी याचा निकाल जाहीर करण्यात आला.
४८ हजारांहून अधिक नोकऱ्या मिळतील
या प्रक्रियेत एकूण ६० कंपन्यांनी अर्ज केला होता. मात्र, यापैकी केवळ १३ कंपन्यांना जमिनी देण्यात आल्या आहेत. नोएडा प्राधिकरणला या भूखंड वाटपांमधून ३४४ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तर, यातून ४८ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा असल्याचे प्राधिकरणाने निवेदनात म्हटले आहे.
जबरदस्त! Paytm Payments Bank ने मार्चमध्ये केले तब्बल ९७ कोटींचे डिजिटल व्यवहार
अदानीसह कोणत्या कंपन्यांना मिळाली जागा?
अदानी एन्टरप्राइझेससह डिक्सन टेक्नोलॉजीज, अग्रवाल असोसिएट्स, वेव्हटेक्स प्रोजेक्ट्स, एन्क्वाइन टेक न्यूट्री केअर एलएलपी, आरएएफ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, रोटो पंप्स, केके फ्रेगरेन्स, सावी लेथर्स, मिठास स्वीट्स आणि रेस्टॉरंट्स, अॅडोरॅक्स, वेस्टवे इलेक्ट्रॉनिक्स आणि धम्मपुर अल्को केम या कंपन्यांना नोएडामध्ये औद्योगिक जागा देण्यात आली आहे.