Adani Enterprises Q2 Results : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ निफा आठ पटीने वाढून 1,741 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने मंगळवारी एका निवेदनात ही माहिती दिली. दरम्यान, कंपनीने एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 228 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
अदानी एंटरप्रायझेसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे करपूर्व उत्पन्न 46 टक्क्यांनी वाढून 4,354 कोटी रुपये झाले, तर महसूल 15 टक्क्यांनी वाढून 23,196 कोटी रुपये झाला. कोळसा वगळता कंपनीच्या इतर सर्व मुख्य व्यवसायांमध्ये नफा आणि उलाढालही वाढली आहे.
या व्यवसायातही नफा वाढलाअदानी न्यू इंडस्ट्रीज लि. सोलर मॉड्यूल आणि विंड मिल मॅन्युफॅक्चरिंगसारख्या व्यवसायात गुंतलेली आहे. 1,121 कोटीचा करपूर्व नफा 78 टक्क्यांनी वाढला आहे. तर विमानतळ व्यवसायात तो 31 टक्क्यांनी वाढून 744 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी निवेदनात म्हटले की, “अदानी एंटरप्रायझेस लि. (AEL) लॉजिस्टिक्स, ऊर्जा आणि देशाच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इतर संबंधित क्षेत्रातील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे."
स्टॉक वाढदरम्यान, कंपनीवरील कर्ज मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत 50,124 कोटी रुपयांवरून सप्टेंबर तिमाहीत 52 टक्क्यांनी वाढून 63,855 कोटी रुपये झाले आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, आज आज बीएसईवर कंपनीचे शेअर्स 1.46 टक्क्यांनी किंवा 41 रुपयांच्या वाढीसह 2841.45 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप 3,27,954.68 कोटी रुपये आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)