मुंबई-
हिंडेनबर्गच्या विस्फोटक अहवालानंतर 'अदानी ग्रूप' आता सावरला आहे. गौतम अदानी यांच्यासाठी गेले पाच दिवस खूप सुगीचे ठरले आहेत. अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर पाच दिवसांपूर्वी १,११३ वर व्यवहार करत होता. आज याच शेअरची किंमत २,११८ वर पोहोचली आहे. अदानी समूहासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी 'होळी' गोड ठरताना दिसत आहे. अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअरनं गेल्या पाच दिवसांत तब्बल ९० टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
अदानी पावर सध्या 'पावरफुल' कामगिरी करत असून ४.९९ टक्क्यांच्या वाढीसह प्रतिशेअर १७७.७५ रुपयांचं अप्पर सर्किट लागलं आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला. अदानी समूहाच्या शेअर्समधील उसळी आता एलआयसीने केलेली गुंतवणूक पुन्हा नफ्यात आली आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स कोसळले. परंतु, गेल्या ५ ट्रेडिंग सेशन्समध्ये जोरदार रिकव्हरी दिसून आली. समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ३ मार्च रोजी सर्वाधिक १७ टक्क्यांनी वधारला होता.
एलआयसी गुंतवणूक ९ हजार कोटींच्या नफ्यातएलआयसीने अदानी समूहात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २४ जानेवारीला त्याचे मूल्य ८१.२६८ रुपये एवढे होते. मात्र गेल्या आठवड्यात ते २९ हजार ८९३ कोटी रुपयांवर घसरले होते. गेल्या आठवड्यातील तेजीमुळे गुंवतवणुकीचे मूल्य ३९ हजार रुपयांपर्यंत वाढले.