Lokmat Money > बिझनेस न्यूज > अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी आहे. अदानी कुटुंबानं 'या' कंपनीमध्ये ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वृत्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:24 PM2024-03-28T15:24:31+5:302024-03-28T15:26:42+5:30

अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी आहे. अदानी कुटुंबानं 'या' कंपनीमध्ये ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वृत्त आहे.

Adani family invested rs 6661 crore in ambuja cement company investors rush to buy shares increase stakes | अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी आहे. अदानी कुटुंबानं अंबुजा सिमेंटमध्ये ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वृत्त आहे. अदानी समूहानं गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. यासह देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिमेंट कंपनीतील अदानी कुटुंबाचा हिस्सा ३.६ टक्क्यांनी वाढून ६६.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. उद्योजक गौतम अदानी यांच्या मालकीच्या अंबुजा सिमेंटनं यासंदर्भातील एक निवेदन जारी केलंय. अदानी समूहाच्या सिमेंट व्यवसायासाठी ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरेल, याची क्षमता २०२८ पर्यंत वार्षिक १४० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची योजना असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
 

काय आहेत डिटेल्स?
 

यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये अदानी कुटुबीयांनी ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अंबुजा सिमेंटचा एसीसी लिमिटेड या आणखी एका सिमेंट कंपनीमध्येही कंट्रोलिंग स्टेक आहे. यासह, कंपनीतील अदानी कुटुंबाचा हिस्सा ३.६ टक्क्यांनी वाढून एकूण ६६.७ टक्के झाला आहे," असं कंपनीने एका निवेदनात म्हटलंय.
 

शेअरची स्थिती काय?
 

अंबुजा सिमेंट्सचे शेअर गुरुवारी कामकाजादरम्यान २.५ टक्क्यांनी वाढून ६१७ रुपयांच्या इंट्राडे हायवर पोहोचले. यावर्षी YTD वर हे शेअर १५ टक्क्यांपर्यंत आणि सहा महिन्यांमध्ये ४५ टक्क्यांपर्यंत वाढले. वर्षभरात या शेअरच्या किंमतीत ७१ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातमी ६२४.५५ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी पातमी ३५८.२० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,२१,७७९.६२ कोटी रुपये आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Adani family invested rs 6661 crore in ambuja cement company investors rush to buy shares increase stakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.