M&M Adani Latest Update: सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसमोर त्यांच्या चार्जिंगची महत्त्वाची समस्या असते. अनेक ग्राहकांना ही समस्या भेडसावत आहे. आता देशातील दिग्गज ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानं अदानी समूहासोबत एक मोठा करार केला आहे. महिंद्रा अँड महिंद्रानं (M&M) देशभरात इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अदानी टोटल गॅसच्या युनिटसोबत करार केला आहे.
महिंद्रा आणि अदानी टोटल गॅस यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेला सामंजस्य करार देशभरात ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एक रोडमॅप तयार करेल. याव्यतिरिक्त, भागीदारी, उपलब्धता, नेव्हिगेशन आणि व्यवहार कव्हर करणाऱ्या ग्राहकांना चार्जिंग नेटवर्कमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय एक समाधान पुरवणार आहे.
महिंद्राच्या EV XUV400 ची पोहोच वाढेल
या सहकार्यानं, XUV400 ग्राहकांना आता Bluesense+ ॲपवर ११०० पेक्षा जास्त चार्जरचा अॅक्सेस असेल. यामुळे महिंद्र EV मालकांसाठी चार्जिंगची सोय आणि सुलभता वाढणार आहे.
अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड ही अदानी टोटल गॅस लिमिटेडची उपकंपनी आहे. भारताच्या नेक्स्ट जनरेशन क्लिन एनर्जी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली आहे.